esakal | 'कलाकारांची मतं कधीपासून इतकी महत्त्वाची ठरली?'; समंथाचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha Akkineni

समंथाच्या पोस्टचं सेलिब्रिटींकडून कौतुक

'कलाकारांची मतं कधीपासून इतकी महत्त्वाची ठरली?'; समंथाचा सवाल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

देशातील महत्त्वपूर्ण विषयांवर कलाकार मतं मांडत नसल्याची टीका करणाऱ्या माधम्यांना दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने टोला लगावला आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक उपरोधिक व्हिडीओ पोस्ट केल आहे. त्यात तिने माध्यमांना टोला लगावला आहे. व्हिडीओत तिने म्हटलंय, 'ते : या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचंय. मी : कधीपासून आम्हा कलाकारांची मतं इतकी महत्त्वाची ठरली?' या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने सविस्तरपणे हा विषय मांडला आहे. 

काय म्हणाली समंथा?
'आम्ही करमणूक करणारे आहोत, फॅक्ट चेकर्स नाही. जगाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींवर मतं मांडण्यासाठी कलाकारांना का जबाबदार ठरवलं जातं? आम्हीसुद्धा माणूस आहो आणि आम्हीसुद्धा चुकतो. पण प्रत्येक विषयावर आम्ही बोलत नाही म्हणून किंवा खूपच बोलतो म्हणून आमच्यावर टीका करणं चुकीचं आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? आम्ही जे काम चांगलं करतो तेच आम्हाला करू द्या', अशा शब्दांत समंथाने माध्यमांना सुनावलं. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी लाइक केलं असून तिच्या मताशी सहमती दर्शवली आहे. यामी गौतम, प्रग्या जैस्वाल, विमला रमण यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना राणावतचा 'थलायवी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. समंथाने सोशल मीडियावर या ट्रेलरचं आणि कंगनाच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. याआधी २०१९ मध्येही समंथाने कंगनाच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचीही स्तुती केली होती. 

हेही वाचा : मुहूर्त ठरला; प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ

समंथा लवकरच 'शाकुंतलम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गुणशेखरने केलं असून निलिमा गुणा आणि दिल राजू हे निर्माते आहे. त्यानंतर 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती झळकणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून समंथा वेब विश्वात पदार्पण करत आहे.