esakal | आमिरच्या मुलीचा फोटो, नेटकरी म्हणाले 'हा तर छोटा आमिर'
sakal

बोलून बातमी शोधा

आमिरच्या मुलीचा फोटो, नेटकरी म्हणाले 'हा तर छोटा आमिर'

आमिरच्या मुलीचा फोटो, नेटकरी म्हणाले 'हा तर छोटा आमिर'

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान (amir khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी आमिर आणि किरण राव यांचा घटस्फोट झाला. त्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत होता. आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्त यांची मुलगी आयरा खान (ira khan) सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच तिने फ्रेंडशिप- डे निमित्तने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोवरील काही नेटकऱ्यांच्या कमेंट्सने सर्वांचे लक्ष वेधले.(actor amir khan daughter ira khan share childhood photo)

आयराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचं एक टीशर्ट परिधान केलेला दिसत आहे. तसेच तिने गळ्यात गुलाबी मण्यांची माळही घातली आहे. या फोटोमध्ये आयरासोबत तिचा बेस्ट फ्रेंड डॅनियल परेरा दिसत आहे. आयराने या फोटोला कॅप्शन दिले, 'तुम्ही या कूल मुलांना भेटला आहात का?'. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली, 'छोटा आमिर', तर दुसरा म्हणाला,'तुझे कान तुझ्या वडिलांसारखेच आहे.' कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'तू अगदी तुझ्या व़डिलांसारखीच दिसतेस'

हेही वाचा: 'तर तुझ्या मुलांना शाप लागेल'; मुलांना ट्रोल करणाऱ्याला लिसाचं उत्तर

काही दिवसांपूर्वी आयराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये तिने बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती कशाप्रकारे नैराश्यात गेली आणि त्याचा सामना कसा केला, याबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. आयरा सध्या फिटनेस प्रशिक्षक नुपूर शिखरेला डेट करत असल्याची चर्चा आहे. त्याच्यासोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचा: 'कुमार सानूचा मुलगा म्हणून काम दिले नाही', जानचा धक्कादायक खुलासा

loading image
go to top