esakal | कोणं म्हणतं घटस्फोट! : समंथा-नागा चैतन्याचं 'फॅमिली प्लॅनिंग'?
sakal

बोलून बातमी शोधा

समंथा-नागा चैतन्याचं 'फॅमिली प्लॅनिंग'?

समंथा-नागा चैतन्याचं 'फॅमिली प्लॅनिंग'?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - द फॅमिली मॅनच्या (the family man season 2) दुसऱ्या भागामध्ये राझीची भूमिका केलेल्या समंथाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ती लोकप्रिय झाली होती. दाक्षिणात्य अभिनेत्री असणाऱ्या समंथाला ( Samantha Akkineni ) या मालिकेनं वेगळी ओळख दिली. त्यामुळे ती बॉलीवूडच्या प्रेक्षकांनाही माहिती झाली. मात्र सध्या ती तिच्या कौटूंबिक कारणामुळे चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसेच आहे. तिनं तिच्या पतीपासून नागा चैतन्यापासून (Naga Chaitanya) विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अशी चर्चा आहे. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर पोटगी घेण्याचाही तिनं विचार केला आहे. यासगळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अफवांना उधाण आलं आहे. नागा आणि समंथामध्ये कुरबुर सुरु झाली आहे. आता समंथा हैद्राबाद सोडून मुंबईमध्ये शिफ्ट होणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र त्यावर तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आपल्या सोशल मीडियावर अभिनेत्री समंथानं ए हंड्रेड अदर रुमर मध्ये काही प्रश्नांची उत्तरं दिली होती. त्यावेळी एका फॅननं समंथाला प्रश्न विचारला होता. तो असा की, तुम्ही हैद्राबाद सोडून मुंबईला शिफ्ट होणार आहात का, त्यावर समंथानं उत्तर दिलं की, हे जे काही बोललं जातंय हे खोटं आहे. मी हैद्राबाद सोडून कुठेही जाणार नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून समंथा आणि नागा चैतन्यामध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात भांडणं सुरु झाली आहेत. आणि तेवढी टोकाला गेली आहेत की, त्यामुळे ते आता वेगळे होणार आहे अशीही चर्चा आहे. जेव्हा समंथा अक्कीनेनीनं तिच्या सोशल मीडियावरुन नागा चैतन्याचं नाव हटवलं होतं तेव्हापासून तिच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या होत्या. काही दिवसांपूर्वी ती नागा चैतन्याच्या एका चित्रपटाच्या पार्टीमध्येही दिसली नाही. त्या पार्टीला बॉलीवूडमधील काही स्टार अभिनेतेही उपस्थित होते. त्यात आमिर खानही होता. समंथा न दिसल्यानं चाहत्यांना कळून चुकले की, त्यांच्यात काही आलबेल नाही.

आता पुन्हा त्यांच्याबद्दल अशी चर्चा आहे की, त्यांनी फॅमिली प्लॅनिंग सुरु केले आहे. त्याचं लग्न 2017 मध्ये झालं. साऊथ इंडस्ट्रीमधील सुंदर जोडपं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामध्ये कटूता आली आहे. आणि त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. असेही म्हटले गेले आहे. असंही म्हटलं जातंय की, नागा चैतन्यला असे वाटते की, समंथानं काही काळ चित्रपट सोडावेत आणि परिवाराकडे लक्ष द्यावं. मात्र सध्या ती चित्रपटांमध्ये मोठी लोकप्रिय होत आहे. अशावेळी तिनं त्या क्षेत्रापासून लांब जाण्याचा कुठलाही विचार नसल्याचे सांगितलं आहे.

हेही वाचा: खबरदार, वन मोअर टेक म्हणाला तर... सुपरस्टारला होतं खडसावलं

हेही वाचा: समंथा पतीपासून दूर मुंबईत राहणार का? चर्चांवर अखेर सोडलं मौन

loading image
go to top