Samantha: समांथा जोमात दीपिका कोमात! शाकुंतलममध्ये इतक्या कोटींचे दागिने घालून दीपिकाला टाकले मागे

Samantha
Samantha Esakal

सध्या मनोरंजन विश्वावर साउथ चित्रपटांचा दरारा आहे. त्यामुळेच दाक्षिणात्य अभिनेते आणि अभिनेत्री यांची जरा जास्तच हवा आहे. साउथ अभिनेत्रींमध्ये अनेक सौदर्यंवती आहेत. त्यातच अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या अभिनयाबरोबरचं सौदर्यंसाठीही लोकप्रिय आहे.

समांथा रुथ प्रभू हिने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती तिच्या आगामी 'शकुंतलम' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये समांथा व्यस्त आहे.

Samantha
Akanksha Dubey Suicide: 'तुच मारलंय आकांक्षाला', बॉयफ्रेंड समर सिंहवर आरोपांचे ढग दाटले?

तिचा हा चित्रपट रिलिजपुर्वीच बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर असो किंवा ट्रेलर प्रेक्षकांना तो खुप आवडला. त्यातच समांथाचा रॉयल लुकने प्रेक्षकांना भुरळ पाडली. आता तिने या चित्रपटात तिने कॅरी केलेल्या दागिन्यांची वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

Samantha
Samantha: घटस्फोटानंतर समांथा पुन्हा पडली पुन्हा प्रेमात ? ट्विट करत म्हणाली, 'तुझ्यासारखं प्रेम'

समांथा रुथ प्रभूच्या आगामी चित्रपटातील तिचा लूक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर तिने परिधान केलेल्या दागिन्यांची किंमत जाणून सर्वांनाच धक्का बसला आहे. वृत्तानुसार या चित्रपटात समांथाने परिधान केलेल्या दागिन्यांची सुमारे किंमत 14 कोटी रुपये आहे.

समांथाच्या चित्रपटाचे सर्व पोस्टर्स चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहेत. या चित्रपटातील पोशाख हा प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केला आहे. तसेच तिने परिधान केलेल्या 14 कोटींच्या दागिन्यांचे श्रेयही नीता यांनाच जाते.

Samantha
Gauri Khan: 52 व्या वर्षी शाहरुखच्या बायकोचं दुसऱ्या क्षेत्रात पदर्पण! फोटो शेअर करत म्हणाली, 'माय लाईफ'

दीपिका पदुकोणनेही पद्मावत चित्रपटात इतके महागडे दागिने घातले नव्हते. या चित्रपटात दीपिकाने सुमारे 11 कोटी 80 लाखांचे दागिने परिधान केले होते. अशा परिस्थितीत समांथाची ज्वेलरी चर्चेचा भाग बनली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com