
Gauri Khan: 52 व्या वर्षी शाहरुखच्या बायकोचं दुसऱ्या क्षेत्रात पदर्पण! फोटो शेअर करत म्हणाली, 'माय लाईफ'
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सेलिब्रिटि म्हटलं तर त्यांची फॅमिली चाहत्यांचा जवळचा विषय असतो. तसंच शाहरुखच्या कुटूंबाबद्दलही आहे. मग आर्यन असो किंवा सुहाना त्याचबरोबर शाहरुखची सुंदर पत्नी गौरी ही देखील चर्चेत असते.
पत्नी आणि आई असण्यासोबतच व्यवसायाने गौरी एक उत्कृष्ट इंटिरियर डिझायनर आणि व्यावसायिक महिला देखील आहे.
गौरी खान नेहमीच काहीतरी नवीन आणि मजेदार करत असते. दरम्यान, गौरी खानने रविवारी इंस्टाग्रामवर 'माय लाइफ इन डिझाईन' नावाचे तिचे पहिले पुस्तक लिहिणार असल्याचं सांगतिलं. या पुस्ताकद्वारे ती लेखन क्षेत्रात पदापर्ण करणार आहे.
गौरी खानने तिच्या पुस्तकाची घोषणा अगदी वेगळ्या पद्धतीने केली आहे. या पोस्टसोबत तिने तिचा फॅमिली फोटोही शेअर केला आहे.
ज्यामध्ये गौरी खान, शाहरुख खान आणि तिन्ही मुले एकत्र दिसत आहेत. या फोटोमध्ये किंग खानची फॅमिली खूपच स्टायलिश दिसत आहे.
शाहरुख आणि गौरीसह त्याच्या तीन मुलांनी काळ्या आणि पांढर्या रंगाचे पोशाख कॅरी केले आहेत.
गौरी खान काळ्या रंगाच्या वन पीस आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचवेळी शाहरुख खान ब्लॅक लेदर जॅकेट, ब्लॅक टी-शर्ट आणि मॅचिंग पँट घातलेला दिसत आहे.
आर्यन आणि अबरामही काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. सुहाना खानबद्दल बोलायचे झाले तर ती ब्लॅक अँड व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
फोटो शेअर करताना गौरी खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, "कुटुंब ते आहे जे घर बनवतं... @PenguinIndia कॉफी टेबल बुकसाठी उत्सुक... लवकरच येत आहे." गौरीने या चित्रासह तिच्या पुस्तकाची घोषणा करताच तिला चाहत्यांनी प्रचंड उत्सूकता दाखवली आहे. स्टार्सनीही कमेंट्सद्वारे गौरीचे अभिनंदन केले.