Samantha Ruth Prabhu : 'आता मी आयुष्याच्या...'! नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर समंथा पुन्हा बोलली

दोन्ही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरुन त्या गोष्टीविषयी चाहत्यांना कल्पना दिली होती.
Samantha Ruth Prabhu on failed marriage
Samantha Ruth Prabhu on failed marriageesakal

Samantha Ruth Prabhu on failed marriage: साऊथची प्रख्यात अभिनेत्री समंथा ही नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे. आता तिनं बॉलीवूडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅन पासून समंथानं तिच्या नावाची वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनावर उमटवली होती.

सध्या समंथा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंगांमुळे चर्चेत आली आहे. खरं तर यापूर्वीच तिचा प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यासोबत घटस्फोट झाला आहे. दोन्ही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरुन त्या गोष्टीविषयी चाहत्यांना कल्पना दिली होती. त्यानंतर ते दोघेही पुन्हा एकत्र येणार याविषयी चर्चेला उधाण आले होते. यावरही समंथानं प्रतिक्रिया देऊन ट्रोल कऱणाऱ्यांना गप्प केले होते.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

आता पुन्हा एकदा समंथाच्या त्या वक्तव्यानं तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. तिनं नागा चैतन्यासोबतच्या वैवाहिक आयुष्यावर भाष्य केले आहे. यामध्ये तिनं आजवर तिच्या आय़ुष्यामध्ये जे कटू प्रसंग आले त्याविषयी सांगितले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी देखील तिचे सांत्वनपर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी समंथानं तिला झालेल्या त्या दुर्मिळ आजाराविषयी पोस्ट शेयर केली होती.

एकीकडे मायोसायटिस सारखा आजार आणि दुसरीकडे सतत फ्लॉप होणारे चित्रपट यामुळे समंथा त्रस्त झाल्याचे दिसून आले आहे. यावरही तिनं प्रतिक्रिया दिली आहे. समंथानं सोशल मीडियावर तो फोटो शेयर करुन त्यावर जी कॅप्शन लिहिली आहे त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. समंथा त्यामध्ये म्हणते की, आता मी आयुष्याच्या एका शेवटच्या स्तरावर येऊन पोहचली असून त्यामुळे अनावश्यक गोष्टींचा फारसा विचार करत नाही.

त्या गोष्टींचा माझ्या कामावर खूपच परिणाम झाला. एकीकडे आजारपण आणि दुसरीकडे वैयक्तिक नात्यातील माझे संबंध याविषयी सोशल मीडियावर होणारी चर्चा, त्यातून माझ्याविषयी केले जाणारे आरोप याचाही परिणाम माझ्यावर झाला. या सगळ्या काळात मी अशा अभिनेत्यांविषयी वाचले ज्यांना माझ्यासारख्या परिस्थितीतून जावे लागले होते. त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळे मला ट्रोलिंगला उत्तर देण्याचा आत्मविश्वास मिळाला.

Samantha Ruth Prabhu on failed marriage
Tejas Twitter Review: कंगनाचा तेजस सिनेमा कसा आहे? बघा लोकांच्या प्रतिक्रिया

बिकट परिस्थितीचा सामना करुन आपली वेगळ ओळख निर्माण करणाऱ्या त्या सेलिब्रेटींविषयी मी जेव्हा वाचले तेव्हा मला आत्मविश्वास मिळाला. याचे समाधान आहे. आपल्या देशात एक लोकप्रिय कलाकार असणं हे मोठं गिफ्ट आहे. मात्र त्याचबरोबर जी जबाबदारी आपल्यासोबत येते त्याचेही भान तुमच्याकडे असायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com