Samantha Video: काल-परवापर्यंत हिंदीत बोल म्हटलं की धूम ठोकायची समंथा..आता फाडफाड हिंदी बोलत मुंबईकरांना दिला धक्का

मुंबईत आपला आगामी सिनेमा 'शकुंतलम'च्या प्रमोशन निमित्तानं समंथा आली होती. त्या कार्यक्रमात हिंदी बोलतानाचा तिचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth PrabhuInstagram
Updated on

Samantha Ruth Prabhu: टॉलीवूडच नाही तर बॉलीवूडमध्येही आपली तगडी ओळख कायम करणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी 'शाकुंतलम' सिनेमामुळे भलतीच चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहे. या दरम्यान मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सिनेमाच्या एका प्रमोशनल कार्यक्रमा दरम्यान समंथा उपस्थित राहिली होती.

या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समंथानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला मुंबईतील रस्त्यांचा नजारा दिसत आहे,त्यानंतर कार्यक्रमाची झलक पहायला मिळतेय आणि मग होते समंथाची एन्ट्री. ती खूपच स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे.(Samantha Ruth Prabhu tollywood actress hindi speaking video fans appreciated)

Samantha Ruth Prabhu
Sai Tamhankar: 'सालस म्हणजे काय..,माहितीय का?,सईला नेटकऱ्यानं छेडलं

व्हिडीओत पुढे समंथा ऑडिटोरियममध्ये दिसत आहे,जिथे खूप मोठ्या संख्येनं लोक कार्यक्रमात उपस्थित राहिलेले दिसत आहेत. आता यापुढे जे घडलं ते कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या सगळ्यांसाठीच आनंदाचा धक्का देणारं होतं. कारण याच कार्यक्रमात साऊथची समंथा जी कालपरवा पर्यंत तोडकंमोडकं हिंदी बोलायची किंवा हिंदी बोलायचा प्रयत्न देखील करताना दिसायची नाही. तिच समंथा फाडफाड हिंदी बोलताना दिसली.

ती म्हणाली, “शकुंतलम के ट्रेलर को आपने जैसा सपोर्ट किया और जो प्यार दिया, उसके लिए बहुत शुक्रिया. मुझे उम्मीद है कि आप इसी तरह शुकंतलम फिल्म की टीम को अपना सपोर्ट देंगे और फिल्म सिर्फ थिएटर्स में जाकर देखेंगे.”

Samantha Ruth Prabhu
Akanksha Dubey Suicide:'रियल लाईफमध्ये माझ्यासोबत नाही तर..', आकांक्षा दुबे केसमध्ये आरोपी समर सिंगचा खळबळजनक दावा

या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये समंथानं लिहिलं आहे की,''मुंबई तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद''. पुढे तिनं हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. समंथाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे आणि लोकं तिच्या हिंदीची जोरदार प्रशंसा करताना दिसत आहेत.

या व्हिडीओवर कमेंट करत एका युजरनं लिहिलं आहे,'वा..तु किती स्पष्ट हिंदी बोलतेस'. ज्यावर समंथानं उत्तर देत लिहिलंय,'' हो..अखेर मी बोलले''.

आणखी एका यूजरनं लिहिलं आहे,''खूप सुंदर हिंदी बोलतेयस''. तिच्या हिंदीसोबत लोकांनी तिच्या लूकची देखील प्रशंसा केली आहे. एका युजरनं तिला 'एंजेल' म्हटलं आहे. समंथाचा 'शाकुंतलम' सिनेमा १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.