esakal | अफेअरच्या चर्चांवर समंथाच्या स्टायलिस्टचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

samantha preetham and naga chaitanya

अफेअरच्या चर्चांवर समंथाच्या स्टायलिस्टचा खुलासा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता नाग चैतन्यला Naga Chaitanya घटस्फोट देत असल्याचं जाहीर केल्यापासून समंथा रुथ प्रभूला Samantha Ruth Prabhu मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. स्टायलिस्ट प्रीतम जुकल्कर याच्याशी अफेअर असल्यामुळे समंथाने घटस्फोट घेतला, अशाही चर्चा होत्या. या चर्चांवर आता प्रीतमने मौन सोडलं आहे. समंथाला मी बहीण मानतो, असं तो म्हणाला. त्याचसोबत नाग चैतन्य या चर्चांना पूर्णविराम लावू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही, अशा शब्दांत प्रीतमने नाराजी व्यक्त केली.

२ ऑक्टोबर रोजी समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. या घटस्फोटाला समंथाचं अफेअर कारणीभूत असल्याची टीका काही नेटकऱ्यांनी केली होती. समंथा आणि तिचा स्टायलिस्ट प्रीतम यांच्यात जवळीक निर्माण झाल्याने नाग चैतन्यने घटस्फोट घेतला, असंही काहींनी म्हटलं.

हेही वाचा: Samantha |"ते म्हणतात माझं अफेअर होतं, मी गर्भपात केला"

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत या चर्चांवर प्रीतम म्हणाला, "नाग चैतन्यने ज्या पद्धतीने मौन बाळगलं, त्यावर मी खूप नाराज आहे. समंथा माझ्या बहिणीसारखी आहे आणि मी तिला जिजी म्हणून हाक मारतो. हे सर्वांना ठाऊक आहे. उत्तर भारतीय लोक बहिणीला जिजी म्हणतात. ज्या व्यक्तीला मी माझी बहीण मानतो, तिच्याशी माझं अफेअर कसं असू शकतं?

"मी चैतन्यला गेल्या काही वर्षांपासून ओळखतो. समंथा आणि माझं नातं कसं आहे हे त्यालासुद्धा नीट माहित आहे. चैतन्यने याबद्दल बोलायला पाहिजे होतं. सॅम आणि माझ्याबद्दल असे कमेंट्स करू नका, असं तो इतरांना सांगू शकत होता. जरी त्याने एक स्टेटमेंट जारी केलं असतं तरी खूप फरक पडला असता," असं तो पुढे म्हणाला. सोशल मीडियावर अनेकांकडून अश्लील मेसेज, धमक्या येत असल्याचंही प्रीतमने यावेळी सांगितलं.

हेही वाचा: केवळ समंथा-नाग चैतन्यच नाही; नागार्जुन यांच्या कुटुंबातील घटस्फोटांचा इतिहास

काही दिवसांपूर्वी समंथासुद्धा इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित अनेक आरोपांबाबत व्यक्त झाली. 'ते म्हणतात, माझं अफेअर होतं, मला मूल नको होतं, मी संधीसाधू आहे आणि आता तर मी गर्भपात केला आहे अशीही अफवा पसरली आहे. घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत क्लेशकारक असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे शाब्दिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. पण मी तुम्हाला वचन देते, या गोष्टींमुळे आणि ते जे काही म्हणतील त्याने मी खचून जाणार नाही,' अशी पोस्ट तिने लिहिली होती.

loading image
go to top