"तीच लोकं माझ्यासोबत सेल्फीसाठी उत्सुक असतात"; अर्जुनने ट्रोलर्सना फटकारलं | Arjun Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Kapoor

"तीच लोकं माझ्यासोबत सेल्फीसाठी उत्सुक असतात"; अर्जुनने ट्रोलर्सना फटकारलं

अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांना त्यांच्या वयातील अंतरावरून अनेकदा ट्रोल केलं गेलंय. अर्जुनने वारंवार या ट्रोलिंगवर उत्तर दिलं असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो पुन्हा एकदा त्यावर व्यक्त झाला आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यात १२ वर्षांचं अंतर आहे. अर्जुन ३६ वर्षांचा तर मलायका ४८ वर्षांची आहे. "वयातील अंतरावरून त्यांच्या नात्याला परिभाषित करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे", अशा शब्दांत अर्जुनने ट्रोलर्सना फटकारलं.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, "सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे, सोशल मीडियावरील सर्व कमेंट्स मीडियाच वाचत असेल. आमच्या पोस्टवर येणाऱ्या ९० टक्के कमेंट्सकडे आम्ही लक्षसुद्धा देत नाही. ट्रोलिंगला इतकं महत्त्व आम्ही देत नाही, कारण ते सर्व बनावट असतं. तीच लोकं जेव्हा मला भेटतील तेव्हा माझ्यासोबत सेल्फीसाठी उत्सुक असतील. त्यामुळे त्यांच्या कमेंट्सवर आपण विश्वास ठेवू शकत नाही."

"माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी जे करतो ते माझे विशेषाधिकार आहेत. जोपर्यंत माझ्या कामाचं कौतुक होतंय, तोपर्यंत बाकी सर्वकाही फक्त गोंगाट आहे. शिवाय, कोणाचं वय किती आहे यावरून तुम्ही त्यांच्या नात्याचा अंदाज लावू शकत नाही. म्हणून आपण फक्त मोकळेपणे जगलं पाहिजे, इतरांनाही जगू द्या आणि पुढे जा. माझ्या मते, एखाद्याच्या वयावरून नात्याला परिभाषित करणं हा मूर्खपणा आहे", अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना सुनावलं.

हेही वाचा: 'बिग बॉस मराठी'चा चौथा सिझन 'या' महिन्यात होणार लाँच?

मलायका आणि अर्जुन हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली ही जोडी आहे. सुरुवातीला दोघांनीही रिलेशनशिपबद्दल बोलणं टाळलं होतं. मात्र अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर या दोघांनीही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली. अर्जुनने याआधीही वयावरून प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

अर्जुन लवकरच मोहित सुरीच्या 'एक विलन रिटर्न्स' या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय 'कुत्ते' हा त्याचा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये नसीरुद्दीन शाह, कोंकना सेन शर्मा, तब्बू आणि राधिका मदन यांच्या भूमिका आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top