Sameer Wankhede : सरकारी अधिकारी पण, थाट उद्योगपतीला लाजवणारा! वानखेडेंची संपत्ती माहितीये?

आता वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली आहे. तत्पुर्वी सीबीआयनं केलेल्या तपासातून वानखेडे यांच्याबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Sameer Wankhede NCB Luxurious Life style Aryan Khan case
Sameer Wankhede NCB Luxurious Life style Aryan Khan case

Sameer Wankhede NCB Luxurious Life style Aryan Khan case : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख मुलगा आर्यन खानला एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अटक केली होती. त्यानंतर ते जास्तच चर्चेत आले. त्या केसला हायप्रोफाईल केस म्हणून बोललं जाऊ लागले. सोशल मीडियावर वानखेडेंची चर्चा सुरु झाली. त्यांनी केलेला तपास हा आकसापोटी किंवा कोणत्या विशिष्ट हेतूनं तर केला नाही ना असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आता वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली आहे. तत्पुर्वी सीबीआयनं केलेल्या तपासातून वानखेडे यांच्याबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यांनी आर्यन खान प्रकरणात खंडणी घेण्याचा प्रयत्न केल्याचे सीबीआयनं म्हटले आहे. वानखेडे आणि त्यांच्या टीमनं आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

या प्रकरणात शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानीची साक्ष आता घेतली जाणार आहे. तिची साक्ष सगळ्यात महत्वाची ठरणार आहे. वानखेडे यांनी सुरुवातीला २५ संशयित आरोपींची यादी केली होती त्यानंतर ती यादी १० वर कशी आली असाही प्रश्न समोर आला आहे. यासगळ्यात वानखेडे आणि त्यांची संपत्ती याचीही चर्चा होताना दिसते आहे. वानखेडे यांच्यावर नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचाही आरोप झाला आहे.

Sameer Wankhede NCB Luxurious Life style Aryan Khan case
The Kerala Story: 'केरळमधील 'ही' शहरं आहेत दहशतवादाची मुख्य केंद्र..',सुदिप्तो सेन यांनी आता सरकारची झोपच उडवली

इन्कम टॅक्सच्या रिपोर्टनुसार वानखेडे यांचे वार्षिक उत्पन्न हे १५ लाख एवढे आहे. याशिवाय २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या काळात वानखेडे यांचे परदेश दौरे याविषयीची माहिती समोर आली आहे. त्यांनी आतापर्यत दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, आर्यलंड दुबई या देशांचे दौरे केले आहेत. यामध्ये त्यांनी परदेश दौऱ्यात ९ लाख रुपयांचा खर्च केला असून तो खर्च विमान प्रवासाचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Sameer Wankhede NCB Luxurious Life style Aryan Khan case
Sameer Wankhede: 'आर्यन खानचं नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत' ; कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट

ताज एक्झोटिका हे जे मालदीवमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे तिथे वानखेडे थांबले होते. त्यांच्या मित्राच्या क्रेडिट कार्डनं ते पैसे दिले गेले असे सांगण्यात आले. वानखेडे यांच्या महागड्या घड्याळाची चर्चा रंगली होती. त्यांच्याकडे २२ लाख रुपये किंमतीचे रोलेक्स घड्याळ असून त्याविषयी त्यांनी चौकशी करणाऱ्या विभागाला माहिती दिलेली नाही. वानखेडे यांच्या परदेश दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. यात ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी त्यांच्या दुबई दौऱ्याचा उल्लेख केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com