
हिंदीसोबत अनेक तेलुगू, तामिळ चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या कलाविश्वापासून लांब आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा ती बॉडी शेमिंगवरही मोकळेपणाने व्यक्त झाली आहे. समीराने नुकताच तिचा एक जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने किशोरवयात असताना तिला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं, त्याबद्दल लिहिलं आहे. समीराला अडखळत बोलण्याचा त्रास होता. त्यामुळे तिला अनेकांनी चिडवलं तर काहींनी तिला अपमानास्पद वागणूक दिली. ते वाईट अनुभव सांगत समीराने नेटकऱ्यांना एक चांगला संदेशसुद्धा दिला आहे.
स्थूलपणामुळेही समीराला टीकांचा सामना करावा लागला होता. याविषयीसुद्धा तिने पोस्टमध्ये लिहिलंय. 'अडखळत बोलण्याचा त्रास आणि स्थूलपणामुळे मला अनेक टीकाटिप्पणींना सामोरं जावं लागलं होतं. मी माझ्या मुलांना सर्वांचा आदर करायला आणि सर्वांशी प्रेमळ वागायला शिकवणार आहे. सगळ्या प्रकारच्या फरकांना आनंदाने स्वीकारायला शिकवणार आहे. कारण प्रत्येक माणूस सारखा नसतो. त्या त्रासदायक कमेंट्सना सहन करणं खूपच कठीण होतं', असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय.
समीराने २००२ साली 'मैंने दिल तुझको दिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने संजय दत्त आणि सोहैल खान यांच्यासोबत भूमिका साकारली. त्यानंतर तिने डरना मना है, मुसाफीर, रेस यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. २०१३ मध्ये ती कन्नड चित्रपटात झळकली. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांबच गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.