हिंदू राजांना इतिहासाच्या पुस्तकात स्थान आहे कुठे? अक्षय कुमारचा प्रश्न|Samrat Prithviraj Movie Akshay Kumar interview | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samrat Prithviraj Movie Akshay Kumar interview

हिंदू राजांना इतिहासाच्या पुस्तकात स्थान आहे कुठे? अक्षय कुमारचा प्रश्न

Bollywood News: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. (Samrat Prithviraj) त्यावरुन आता वेगवेगळ्या प्रकारचे वादही समोर आले आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं अक्षय कुमारनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये (bollywood actor) धक्कादायक विधान केले आहे. त्यात त्यानं भारतीय इतिहासात हिंदू राजांचा जो गौरव केला आहे तो मात्र क्रमिक पुस्तकात, शालेय (Akshay Kumar) शिक्षणात नाही. याची आपल्याला नेहमीच खंत वाटत आली आहे. असे अक्षयनं म्हटलं आहे. त्यावरुन पुन्हा एकदा अक्षयवर टीका होऊ लागली आहे.

पृथ्वीराजच्या प्रचाराच्या वेळी अक्षय कुमारनं केलेलं विधान आता चर्चेत आलं आहे. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या टीकाही होत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराजची चर्चा आहे. कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. अक्षय कुमारचा कोणताही चित्रपट असला तरी त्याच्यावरुन वाद होणं हे आता त्याच्या चाहत्यांच्या अंगवळणी पडले आहे. या चित्रपटाच्या नावावरुन वाद झाला होता. त्यात करणी सेनेनं पृथ्वीराज यांच्या नावाचा उल्लेख रजपूत चौहान असा करावा अशी मागणी केली होती. त्यावरुन सम्राट पृथ्वीराज वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता अक्षयनं सम्राट पृथ्वीराजच्या प्रमोशन दरम्यान भारतीय शाळेतील इतिहासातील काही चुका प्रेक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

हेही वाचा: कसा आहे अक्षयचा 'सम्राट पृथ्वीराज'?काय म्हणतायत प्रेक्षक;वाचा Public Review

अक्षयनं आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मला आपल्या शालेय शिक्षणाबाबत नेहमीच एक चिंता वाटते. ती म्हणजे आपण त्याचा गांभीर्यानं विचार करायला मागत नाही. आपण विद्यार्थ्यांना कोणता इतिहास शिकवतो. ज्या व्यक्तींनी मोलाचे योगदान आपल्या धर्मासाठी, देशासाठी दिले आहे त्यांचा इतिहासच आपल्याला शिकवला जात नाही. ही गोष्ट कुणाच्याही ध्यानात येऊ नये हेही विशेष आहे. असे मला आवर्जुन सांगावे लागेल.

Web Title: Samrat Prithviraj Movie Akshay Kumar Statement Indian History Controversy Related Great Indian Leader

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top