Sana Khan Baby: लग्नानंतर ईस्लामसाठी अभिनय सोडणाऱ्या सना खानने दिला मुलाला जन्म, सगळीकडून कौतुक

माजी अभिनेत्री सना खानने बुधवारी इंस्टाग्रामवर आपल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली
Sana Khan And Husband Anas Saiyad Welcome A Baby Boy
Sana Khan And Husband Anas Saiyad Welcome A Baby Boy SAKAL

Sana Khan Blessed With Baby Boy News: अभिनेत्री सना खानने बुधवारी इंस्टाग्रामवर आपल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली.

तिने आणि तिचे पती अनस सय्यद यांनी त्यांच्या बाळाच्या आगमनाची बातमी त्यांचे चाहते आणि फॅन्ससोबत शेअर केली. आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी तिने कुराणातील एक आयत शेअर केली.

(Sana Khan And Husband Anas Saiyad Welcome A Baby Boy)

Sana Khan And Husband Anas Saiyad Welcome A Baby Boy
Coco Lee Death: हाँगकाँगची पॉप गायिका कोको ली यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन, संगीतविश्वाला धक्का

सना आणि अनस यांनी सोशल मिडीयावर लिहीलंय की... “अल्लाह आम्हाला आमच्या बाळासाठी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवो.

अल्लाह की अमानत है बहतर बनाना है. तुमच्या प्रेम आणि दुआसाठी सर्वांना शुभेच्छा ज्याने आमच्या या सुंदर प्रवासात आमचे हृदय आणि आत्म्याला आनंद दिला,” असं या जोडप्याने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले.

Sana Khan And Husband Anas Saiyad Welcome A Baby Boy
Aishwarya Narkar ऐश्वर्या नारकरचं माहेरचं नाव माहीताये का?

याशिवाय त्यांच्या पोस्टसह एक छोटा व्हिडिओ देखील जोडला ज्यामध्ये लिहिले आहे, "अल्लाह तलने मुकद्दर मै लिखा फिर उसको पुरा किया और आसन किया, और जब अल्लाह देता है तो खुश और मुसररा के साथ देता है.

तो अल्लाह तलने हमे बेटा दिया (अल्लाहने आमच्या नशिबात हे लिहिले आणि नंतर आम्हाला ही भेट दिली. जेव्हा अल्लाह आपल्याला काही देतो तेव्हा तो त्याच्या पूर्ण मनाने आणि आनंदाने देतो. अल्लाहने आम्हाला मुलगा दिलाय)."

बिग बॉस 6 आणि सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटात काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सनाने नोव्हेंबर 2020 मध्ये अनसशी लग्न करण्यापूर्वी तिची अभिनय कारकीर्द सोडली.

सना खानने लग्नानंतर ईस्लाम धर्माचा स्वीकार केला. यापूर्वी मार्च 2023 मध्ये तिने एका मुलाखतीत तिच्या गरोदरपणाच्या बातमीची पुष्टी केली होती.

या जोडप्यावर चाहत्यांनी कुटुंबावर आशीर्वादांचा वर्षाव केला. “अल्लाह आपके बेटे को नेक बनाए आमीन (अल्लाह तुमच्या मुलाला तुमच्यासारखा बनवो),” असे एकाने लिहिले. "माशाअल्लाह. अल्लाह लहान मुलाला आशीर्वाद देवो. आमिन,”

दुसऱ्याने लिहिले. आणखी एका चाहत्याने लिहिले, “माशाअल्लाह नवीन पालकांचे अभिनंदन. अल्लाह तुमच्या लहान कुटुंबाला आशीर्वाद देवो.” अशी पोस्ट लिहीत चाहत्यांनी सना आणि अनसचे अभिनंदन केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com