...आणि मालिकेला नाव मिळालं 

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

छोट्या पडद्यावरची चुलबुली लक्षवेधी अभिनेत्री सनाया इरानी हिची "बहने' नावाची नवी मालिका येतेय, अशी चर्चा होती. पण या मालिकेचं असं बहनजी टाईप नाव ऐकून तिच्या चाहत्यांनी नाकं मुरडली होती. "इस प्यार को क्‍या नाम दू', "रंगरसिया' या मालिकांमधून शेवटची दिसलेली आणि "सरोजिनी' ही मालिका नाकारलेली सनाया या अशा मालिकेतून परत येतेय. तिच्या फॅन्सचा यावर विश्‍वासच बसेना. मग या मालिकेविषयी दुसरी चर्चा येऊन धडकली. ती अशी की, शूटिंग सुरू होईपर्यंत या मालिकेचं नावच ठरत नव्हतं. त्यामुळे "बहने' हे नाव असंच थोड्या वेळापुरतं ठेवलं होतं. पण आता या मालिकेला "रब से मांगा तुझे' हे नाव मिळालंय.

छोट्या पडद्यावरची चुलबुली लक्षवेधी अभिनेत्री सनाया इरानी हिची "बहने' नावाची नवी मालिका येतेय, अशी चर्चा होती. पण या मालिकेचं असं बहनजी टाईप नाव ऐकून तिच्या चाहत्यांनी नाकं मुरडली होती. "इस प्यार को क्‍या नाम दू', "रंगरसिया' या मालिकांमधून शेवटची दिसलेली आणि "सरोजिनी' ही मालिका नाकारलेली सनाया या अशा मालिकेतून परत येतेय. तिच्या फॅन्सचा यावर विश्‍वासच बसेना. मग या मालिकेविषयी दुसरी चर्चा येऊन धडकली. ती अशी की, शूटिंग सुरू होईपर्यंत या मालिकेचं नावच ठरत नव्हतं. त्यामुळे "बहने' हे नाव असंच थोड्या वेळापुरतं ठेवलं होतं. पण आता या मालिकेला "रब से मांगा तुझे' हे नाव मिळालंय. आणि या नावावरच शिक्कामोर्तब झालंय. सनायाची "इस प्यार को क्‍या नाम दूँ' ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. बरून सोबती आणि तिची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. ही मालिका बंद झाल्यावर सनाया कधी परतणार याची उत्सुकता होती. पण आता प्रेक्षकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. तिची "रब से मांगा तुझे' ही मालिका लवकरच सोनी टीव्हीवर येतेय आणि ही मालिका "कुछ रंग प्यार के ऐसे भी' या सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या मालिकेची जागा घेणार आहे. "कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेच्या निर्मात्यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. "रब से मांगा तुझे' या मालिकेत हायपर ऍक्‍टीव्हिटी सिन्ड्रोम असलेल्या एका मुलीची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. "मिले जब हम तुम' या मालिकेपासून ते "रंगरसिया' मालिकेपर्यंत सनायाच्या सगळ्या मालिका छोट्या पडद्यावर हिट ठरल्या होत्या. आता ही तिची नवी मालिका किती लोकप्रिय ठरेल, हे लवकरच आपल्याला कळेल. तोवर सनाया परत छोट्या पडद्यावर येतेय आणि तेही "सोनी टीव्ही' चॅनेलवर. म्हणजे वेगळा विषय आणि त्याची मांडणी हटके असणार हे सांगायला नकोच. कारण शहरी प्रेक्षकांना सोनी टीव्ही मनोरंजनाचा डेली डोस उत्तम प्रकारे देतेय. सनायाची ही मालिकाही यात उजवी ठरावी...  
 

Web Title: sanaya irani serial name