esakal | सुशांत मृत्यु प्रकरणात प्रतिमा मलिन करणार्‍यांवर निर्माता संदीप सिंहचा मानहानीचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

sandip singh sushant

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांनी संदीपवर शंका उपस्थित केली गेली. अशा सर्व चॅनल्स आणि इतर काही व्यक्तींना त्याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे

सुशांत मृत्यु प्रकरणात प्रतिमा मलिन करणार्‍यांवर निर्माता संदीप सिंहचा मानहानीचा दावा

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सिनेनिर्माता संदीप सिंह आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन करणार्‍या टीव्ही चॅनल्सविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांनी संदीपवर शंका उपस्थित केली गेली. अशा सर्व चॅनल्स आणि इतर काही व्यक्तींना त्याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संदीप आणि सुशांतची जवळची मैत्री होती. 

हे ही वाचा: सुशांत सिंहच्या कुटुंबातील मोठी बातमी; चुलत भावाला हृदयविकाराचा झटका

संदीपने ही कायदेशीर नोटीस त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलीये. प्रतिमा मलिन करणे आणि खोट्या बातम्या चालवण्याबद्दल ही कायदेशीर नोटीस आहे.नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसात  विनाअट सार्वजनिकरित्या माफी मागावी असं यामध्ये म्हटलंय.इतकंच नाही तर  २०० कोटींची भरपाई देखील त्याने मागितली आहे.संदीप सिंहने 'मेरी कोम', 'अलीगढ', 'सरबजीत', 'भूमी' आणि 'पीएम नरेंद्र मोदीं'चं बायोपिक सारखे बॉलीवूड सिनेमे बनवले आहेत. 

सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या वांद्रे येथील घरी आत्महत्या केली. संदीप हा सुशांतचा मित्र आणि परिवारातील जवळचा आहे असं त्याने म्हटलं होतं. संदीप या प्रकरणात तात्काळ घटनास्थळी पोहोचणार्‍यांपैकी एक होता. 

सीबीआय चौकशी पूर्ण

अभिनेता सुशांतसिह राजपूत मृत्यूप्रकरणाची सीबीआय करत असलेली चौकशी पूर्ण झालीय. सीबीआयला याप्रकरणात कोणतेही कट कारस्थान आढळले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने आपली चौकशी पूर्ण केली असून पटणाच्या सीबीआय कोर्टात यासंदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ही आत्महत्या नसून हत्या होती असा ठपका ठेवण्यात आला होता. राज्य सरकारच्या मोठ्या नेत्यांच्या दबावामुळे हे प्रकरण पुढे येत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं.

त्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण बरेच दिवस चर्चेत राहीले. पण प्रत्यक्ष सुशांत मृत्यु प्रकणात काही महत्वाची माहिती समोर येत नव्हती. त्यानंतर आता सीबीआयने हा तपास पूर्ण केल्याचं सांगण्यात येतंय.

sandip singh seeks rs 200 cr compensation as he files defamation case against news channel