Sangharsh Yodha: 'मी बायकोला सांगितलंय हे बघ जर....' जरांगे पाटलांच्या चित्रपटाचा टीझर एकदा बघाच!

Manoj jarange patil Sangharsh Yodh movie teaser: मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Sangharsh Yodha
Sangharsh Yodha

मुंबई- मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा टिझर नुकताच रिलिझ झाला असून प्रेक्षकांकडून त्याला पसंती मिळत असल्याचं दिसतंय. ( sangharsh yodha manoj jarange patil movie teaser release maratha reservation andolan)

टिझरमध्ये मनोज जरांगे पाटील एकदम डॅशिंग अंदाजामध्ये दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचे चित्रण यामध्ये दिसत आहे. “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” चित्रपट २६ एप्रिलला चित्रपटगृहात पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्राने जरांगेंचे आंदोलन पाहिले आहे. आता हाच संघर्ष प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल.

चित्रपटाच्या टिझरमध्ये, 'मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करणारा अभिनेता म्हणताना दिसतोय की, मी बायकोला जातानाच सांगून आलोय. की आलो तर तुझा आणि नाही आलो तर समाजाचा. कुंकू पुसून तयार राहा.' चित्रपटाचा टिझर जबरदस्त वाटत असून चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा आहे. काही दिवसात चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलिझ होण्याची शक्यता आहे.

Sangharsh Yodha
Manoj Jarange : पोलिसांकडून सहकाऱ्यांना नाहक त्रास ; आंदोलन दडपण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही

मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. देशपातळीवर देखील त्यांची दखल घेण्यात आली होती. अंतरवारी सराटीमधून सुरु झालेले त्यांचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. लाखोंच्या सभा त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात झाल्या. त्यांच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागले.

सुरुवातीला सरकारने मराठा समाजासाठी अध्यादेश काढला आणि मराठा समाजाला दिलासा दिला. त्यामुळे कुणबी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. तसेच मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्याचं स्पष्ट आहे.

Sangharsh Yodha
Manoj Jarange : ''पूर्वी आत्या कान भरायची, आता फडणवीस भरतात'' जरांगेंचे फडणवीसांवर आणखी गंभीर आरोप

मराठा समाजाचे हिरो ठरलेले जरांगे पाटील आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचा जीवन संघर्ष पाहण्याची उत्सुकता आहे. चित्रपटाचे लेखक आणि निर्माते गोवर्धन दोलताडे आहेत, तर चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. तर मुख्य भूमिका रोहन पाटील यांनी केली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांचा लढा अद्याप संपलेला नाही. त्यांनी ८ मार्चनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com