सानिया मिर्झाच्या बहिणीचं ठरलं; माजी क्रिकेटपटूच्या मुलाशी होणार लग्न

वृत्तसंस्था
रविवार, 8 डिसेंबर 2019

- डिसेंबर महिन्यात होणार लग्न.

नवी दिल्ली : टेनिसपट्टू सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा मोहम्मद असदुद्दीन याच्याशी अनमचा विवाह होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

गेल्या काही दिवसांपासून अनम आणि मोहम्मद असदुद्दीन यांच्या लग्नाची चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अनम ही डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. याबाबत दिल्ली टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, अनम आणि असदुद्दीन हे दोघे डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. मे महिन्यात सानिया मिर्झाने आपल्या बहिणीचा भावी नवऱ्याला शुभेच्छांसह अनेक शुभाशिर्वाद दिले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Let’s get you married my baby girl @thelumeweaver

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on

दिल्लीत अनाज मंडी परिसरात भीषण आग; 43 जणांचा मृत्यू

अनम मिर्झाचं दुसरं लग्न

अनम मिर्झाचा विवाह मोहम्मद असदुद्दीन यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अनम मिर्झाचा हा दुसरा विवाह असणार आहे. मागील वर्षी अनम आणि तिचा पूर्वीचा पती व्यावसायिक अकबर रशीद यांच्याशी विभक्त झाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Anam Mirza (@anammirzaaa) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sania Mirzas sister Anam Mirza to tie the knot with Azharuddins son in December