#KGFChapter2 : संजूबाबा पुन्हा 'खलनायक'; 'केजीएफ चॅप्टर 2'चे पोस्टर लॉन्च

Sanjay Dutt s villain look in KGF Chapter 2 launched today
Sanjay Dutt s villain look in KGF Chapter 2 launched today

'केजीएफ चॅप्टर 2'ची सगळीकडेच चर्चा सुरू असताना आज रिलीज झालेल्या पोस्टरमुळे पुन्हा एकदा केजीएफ चॅप्टर 2 ट्रेंडिंगमध्ये आला आहे. याचं कारणंही विशेष आहे. अभिनेता संजय दत्त हा या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका 'अधिरा' नावाच्या खलनायकाची असले. केजीएफचा चाहता वर्ग मोठा आहे, त्यात आता संजय दत्तची भर पडल्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विशेष म्हणजे आज संजय दत्तचा साठावा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवशीच केजीएफ चॅप्टर 2 च्या खलनायकाचा पहिला लूक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा लूक शेअर करत चाहत्यांचे अभार मानले आहेत. 'अधीराच्या निमित्ताने मला या चित्रपटाचा भाग होता आला यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. धन्यवाद!' असा संदेशही त्याने या पोस्टमध्ये दिला आहे. 

केजीएफ अर्थात कोलार गोल्ड फिल्ड्सचा पहिल्या भागाला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यश या अभिनेत्यामुळे आजही या चित्रपटाचा चाहता वर्ग मोठा आहे. आता त्यात संजय दत्त खलनायक म्हणजे सोने पे सुहागा! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com