The Lion Book App : संजय दत्त अन् सुनील शेट्टी ईडीच्या जाळ्यात, 'महादेव बेटिंग' नंतर 'द लायन बूक'चा घोटाळा समोर

संशयित आरोपी हे भारत आणि पाकिस्तानमध्ये ते अॅप चालवत होते. असे तपासातून समोर आले आहे.
Sanjay Dutt Suniel Shetty ED Raid The Lion Book App
Sanjay Dutt Suniel Shetty ED Raid The Lion Book App esakal

Sanjay Dutt Suniel Shetty ED Raid The Lion Book App : महादेव बेटींग अॅपविषयी वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतानाच आणखी एका बातमीनं खळबळ उडवून दिली आहे. लायन बूक अॅपवर आता ईडीनं निशाणा साधला आहे. त्यातून आणखी दोन प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं समोर आली आहेत. यापूर्वी बॉलीवूडमधील रणबीर कपूर, टायगर श्रॉफ, सनी लियोनी, विशाल ददलानी यांची नावं ही महादेव बेटींग अॅपमधून व्हायरल झाली होती.

महादेव बेटिंग अॅपबाबत आता ईडीनं चौकशी सुरु केली आहे. त्यात अनेक अभिनेत्यांची नावं समोर आली आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये चर्चा सुरु झाली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री यामध्ये अडकले तरी कसे असा प्रश्न नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन विचारला आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणात सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल यांना ताब्यात घेतले आहे.

Also Read - केवळ स्त्री म्हणून कामाचा मोबदला कमी मिळतो..?

संशयित आरोपी हे भारत आणि पाकिस्तानमध्ये ते अॅप चालवत होते. असे तपासातून समोर आले आहे. त्यात आता द लॉयन बूक अॅपचे नाव घेतले जात आहे. त्या अॅपचे प्रमोशन हितेश खुशलानी आणि साहिल खान करत होते. इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, द लॉयन बूक अॅपच्या सक्सेस पार्टीचे दिमाखदारपणे आयोजन केले होते. त्या पार्टीमध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी, सोफी चौधरी, स्नेहा उलाल आणि डेजी शाह उपस्थित होते.

Sanjay Dutt Suniel Shetty ED Raid The Lion Book App
Asha Preakh On Kangana : 'तिला फार कळतं का'? ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी टोचले कंगनाचे कान

द लॉयन बूक अॅपचे काम देखील महादेव अॅपसारखेच आहे. अशी बाब तपासातून समोर आली असून काही बॉलीवूड सेलिब्रेटींनी मोठी रक्कम घेऊन त्याचे प्रमोशन केले होते. यापूर्वी इंडिया टुडेनं दिलेल्या एका बातमीनुसार, महादेव अॅपचे प्रमोटर सौरभ चंद्राकरच्या लग्नात अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. जो दुबईमध्ये झाला होता. फेब्रुवारीमध्ये सौरभचे लग्न झाले होते. त्यात टायगर श्रॉफ, सनी लियोनी, विशाल ददलानी आणि नेहा कक्कर सहभागी झाले होते. त्यात रणबीर कपूरला समन्स पाठवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com