संजय दत्त झाला इमोशनल

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

अभिनेता संजय दत्त प्रदीर्घ कालावधीनंतर "भूमी' चित्रपटातून कमबॅक करतोय. आजही त्याचं फॅनफॉलोईंग वाढत असून त्याचे चाहते त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अभिनेता संजय दत्त प्रदीर्घ कालावधीनंतर "भूमी' चित्रपटातून कमबॅक करतोय. आजही त्याचं फॅनफॉलोईंग वाढत असून त्याचे चाहते त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

"भूमी'ची कथा ऐकल्यानंतर संजय खूपच भावूक झाल्याचं चित्रपटाचे लेखक राज शांडिल्य यांनी सांगितलं. दिग्दर्शक ओमांग कुमार, निर्माते संदीप सिंह आणि भूषण कुमार अशा लेखकाच्या शोधात होते जो ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करील. त्यांनी राज यांची निवड केली. त्यांनी चित्रपटासाठी पंधरा-पंधरा तास काम केलं. पूर्ण पटकथा लिहून झाल्यानंतर राज यांनी संजयला कथा ऐकवली.

संजयला स्क्रीप्ट एवढी आवडली, की तो मला मिठी मारून रडू लागला, असे राज यांनी सांगितलं. त्यांनी संजयचं खूप कौतुकही केलं. संजय खऱ्या आयुष्यात सच्चा व चांगला माणूस आहे, असं सर्टिफिकीटही देऊन टाकलं. "भूमी' चित्रपट 22 सप्टेंबरला प्रदर्शित होतोय.

Web Title: Sanjay Dutt turns emotional