संजय दत्तने घेतली नितीन गडकरींची भेट

गडकरींच्या नागपूर इथल्या निवासस्थानी घेतली भेट
Sanjay Dutt, Nitin Gadkari
Sanjay Dutt, Nitin Gadkari file image

अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. संजयने शनिवारी (5 जून) नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी संजय दत्त हा नितीन गडकरी यांच्या कुटुंबीयांनाही भेटला, असं म्हटलं जातंय. याबद्दल कॉंग्रेसचे प्रवक्ते संजय दुबे यांनी माहिती दिली आहे. संजय दुबे यांचा मुलगा गौरव याचे संजयसोबत जवळचे संबंध आहेत. (Sanjay Dutt Visits Nitin Gadkari Nagpur House Pays courtesy Call To Family)

संजयने नागपूरमधील वर्धा रोड येथील नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेट दिली. संजयने या भेटी दरम्यान नितीन गडकरी यांना नमस्कार करून आशिर्वाद घेतला. दोघांमध्ये चर्चा देखील झाली. त्यानंतर संजयने नितीन गडकरी यांच्या घरातील गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी संजयने नितीन गडकरी यांच्या मुलाची देखील भेट घेतली. नितीन गडकरी यांच्या मुलाचे फेब्रुवारीमध्ये लग्न झाले पण कोरोनामुळे त्यांनी रिसेप्शन रद्द केले.

Sanjay Dutt, Nitin Gadkari
शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवणारे 'हे' ८ चित्रपट पाहिलेत का?

2019 मध्ये देखील संजय दत्तने नितीन गडकरी यांचा भेट घेतली होती. ही भेट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधी झाली होती. त्यावेळी संजय निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती.

Sanjay Dutt, Nitin Gadkari
परिणीतीने सांगितला ऑनस्क्रीन इंटिमेट सीनचा अनुभव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com