'अपमान..जरा कुठे हिरोईनसोबत..',कुशल बद्रिकेनं असं काय केलं की चढला संजय जाधवांचा पारा.. Kushal Badrike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kushal Badrike, Sanjay Jadhav

Viral Video: 'अपमान..जरा कुठे हिरोईनसोबत..',कुशल बद्रिकेनं असं काय केलं की चढला संजय जाधवांचा पारा..

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे,ज्यामध्ये दिग्दर्शक संजय जाधव यांनी अभिनेता कुशल बद्रिकेचा सणकून अपमान केला आहे आणि तो देखील चक्क अभिनेत्री प्रार्थना बेहरे समोर. स्वतः संजय जाधव यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत कुशलचं नेमकं काय चुकलं हे त्यांच्या नेहमीच्या हटके अंदाजात सांगितलं आहे.

आता आपण म्हणाल काही दिवसांपूर्वीच कुशल बद्रिके अन् संजय जाधव यांच्यात सगळं आलबेल होतं. त्यांचे काही मजामस्ती करतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. मग अचानक काय झालं की जाधवांचा पारा चढला. (Sanjay Jadhav angry on kushal Badrike video viral, funny video)

संजय जाधव यांच्या आगामी सिनेमात कुशल बद्रिके दिसणार आहे. लंडनमध्ये या सिनेमाचं शूटिंग पार पडलं आहे. शूटिंग दरम्यान कुशल,संजय जाधव आणि प्रार्थना बेहरे यांचे मजेदार व्हिडीओ रील्स समोर आले होते.

नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात कुशल बद्रिके,संजय जाधव आणि प्रार्थना बेहरे असे तिघे दिसत आहेत. पहिल्या फ्रेम मध्ये फक्त संजय जाधव आणि प्रार्थना बेहरे गप्पा मारताना दिसत आहेत. ज्यात संजय जाधव अभिनेत्री प्रार्थना बेहरेला मोबाईलमध्ये काहीतरी दाखवण्यात दंग आहेत. तितक्यात कुशल येतो आणि त्यांना काहीतरी बोलून त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणतो. आता हेच नेमकं संजय जाधव यांना खटकतं आणि त्यावेळी कुशलला खाऊ की गिळू इथपत त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव दिसत आहेत.

संजय जाधव यांच्याविषयी म्हणताना दिसत आहे की,''दादांचा कॅमेरा कोणालाही सुंदर दाखवू शकतो'' ,तेवढ्यात संजय जाधव प्रार्थनाकडे पाहून म्हणतात,''मी याच्यासोबत सिनेमा केलाय नुकताच,त्यात हा खूप छान दिसतोय''. आणि रागानं उठून निघून जातात.

कुशलला सुरुवातीला काही कळत नाही पण प्रार्थना त्याला म्हणते,''हसतोस काय..अपमान करुन गेलेयत तुझा..''

संजय जाधव यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर ही व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. आणि त्याला कॅप्शन देत लिहिलं आहे,''अपमान ....जरा Heroine बरोबर गप्पा मारू म्हटलं तर ... आला!!!!''...''

आता आपणही फार सिरीयस होऊ नका...व्हिडीओत कुशल बद्रिके आहे म्हणजे नक्कीच कॉमेडीचा तडका तर असणारच व्हिडीओला. संजय जाधव यांनी देखील हा व्हिडीओ मजेनंच पोस्ट केला आहे.

खूप दिवसांनी आपण अशा पद्धतीची व्हिडीओ रिल करत आहोत तेव्हा मजा आलीय असं देखील ते म्हणालेयत. तेव्हा हा अपमान मस्करीतच केलेला आहे. बातमीत ही व्हिडीओ लिंक जोडलेली आहे. नक्की पहा. कुशल बद्रिके लवकरच संजय जाधव यांच्या आगामी सिनेमात आपल्याला दिसणार आहे.