अभिनेत्री सोनाली सहगलची लग्नाच्या मंडपात कुत्र्यासोबत धमाल एन्ट्री.. व्हायरल व्हिडीओ पाहून सगळेच थक्क Sonnalli seygall Wedding | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonnalli seygall  Wedding

Viral Video: अभिनेत्री सोनाली सहगलची लग्नाच्या मंडपात कुत्र्यासोबत धमाल एन्ट्री.. व्हायरल व्हिडीओ पाहून सगळेच थक्क

Sonnalli seygall Wedding: बॉलीवूड अभिनेत्री सोनाली सहगल आज लग्नबंधनात अडकली. अभिनेत्रीनं बिझनेसमन आशिष सजनानी सोबत लग्नगाठ बांधली. सोनाली सहगल आणि आशिष सजनानीच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ यावेळी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात अभिनेत्री सोनाली आपल्या पाळीव कुत्र्यासोबत लग्नमंडपात झोकात एन्ट्री घेताना दिसत आहे.

अभिनेत्री सोनाली सहगल काही वर्षांपासून बिझनेसमन आशिष सजनानी याला डेट करत होती. आता तिनं या नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नात तिचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सामिल झाल्याचं दिसून आलं. (Sonnalli seygall entered in wedding with her dog video viral)

५ जूनला मेहेंदी सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोनालीच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तिनं अनेक सिनेमातून कामं केली असली तरी अद्याप तिला हवं तसं यश मिळालेलं नाही,जे अपेक्षित होतं.

तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०११ मधील ब्लॉकबस्टर सिनेमा 'प्यार का पंचनामा' मधून केली. त्यानंतर अभिनेत्रीनं 'प्यार का पंचनामा २','सोनू के टीटू की स्वीटी','नूरानी चेहरा', 'सेटर्स' आणि 'वेडिंग पुलाव' सारख्या सिनेमातूनही ती दिसली.

अभिनेत्री सोनालीचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे,ज्यात तिनं गुलाबी रंगाची ब्रायडल साडी नेसली आहे ,ज्यावर सिल्व्हर स्टोन वर्क केलं आहे. सोनालीनं साडीवर डायमंडचा हेवी नेकलेस,बिंदी,आणि एकदम लाइट मेकअप करत आपला वेडिंग लूक कम्प्लिट केला आहे.

सगळ्यात खास गोष्ट ही आहे की अभिनेत्रीनं आपल्या कुत्र्याला देखील मॅचिंग गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेत. व्हायरल व्हिडीओत हे स्पष्ट दिसत आहे. बातमीत व्हायरल व्हिडीओची लिंक दिलेली आहे.