प्रीती झिंटाला ओळखलंच नाही; दिग्गज अभिनेत्याने मागितली जाहीर माफी | Preity Zinta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Preity Zinta

प्रीती झिंटाला ओळखलंच नाही; दिग्गज अभिनेत्याने मागितली जाहीर माफी

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजय खान Sanjay Khan यांनी अभिनेत्री प्रीती झिंटाची Preity Zinta जाहीर माफी मागितली. संजय खान हे दुबईला जात होते. त्यावेळी त्यांच्या विमानात प्रीतीसुद्धा प्रवास करत होती. मात्र ते प्रीतीलाच ओळखलेच नाही. संजय यांच्यासोबत त्यांची मुलगी सिमोन अरोरासुद्धा होती. सिमोन हिने प्रीतीची ओळख करून दिली तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण तिला चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. याबद्दल संजय खान यांनी ट्विट करत प्रीतीची जाहीर माफी मागितली.

प्रीतीला टॅग करत त्यांनी लिहिलं, 'प्रिय प्रीती, एक सज्जन व्यक्ती म्हणून मी माझं हे कर्तव्य समजतो, की मला तुझी माफी मागायला हवी. दुबईच्या फ्लाइटमध्ये माझ्या मुलीने तुझी ओळख करून दिली तेव्हा मी तुला ओळखू शकलो नाही. झिंटा हे आडनाव ऐकल्यावर मला कदाचित आठवलं असतं. कारण तुझा सुंदर चेहरा मी अनेक चित्रपटांमध्ये पाहिला आहे.'

हेही वाचा: बिग बॉस मराठी ३: दुखावलेल्या विशालने घेतला मोठा निर्णय

संजय खान यांच्या या ट्विटवर अद्याप प्रीतीने काही उत्तर दिलं नाही. प्रीतीने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा जन्म झाल्याचं तिने सांगितलं. जय आणि जिया अशी दोघांची नावं आहेत. प्रीतीने २०१६ मध्ये जीन गुडइनफ याच्याशी लॉस एंजिलिसमध्ये हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. लग्नानंतर प्रीती अमेरिकेला राहायला गेली. कामानिमित्त आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी ती भारतात येते. प्रीतीने १९९८ मध्ये मणी रत्नम दिग्दर्शित 'दिल से' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने 'कल हो ना हो', 'वीर झारा', 'कभी अलविदा ना कहना', 'क्या कहना', 'संघर्ष', 'दिल चाहता है', 'लक्ष्य' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

loading image
go to top