'हीरामंडी' मधून उलगडणार लाहोरच्या वेश्यांची गोष्ट...

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या संजय लीला भन्साळीनं sanjayleela bhansali आता एक मोठी घोषणा केलीय.
sanjay leela bhansali
sanjay leela bhansali

मुंबई - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या संजय लीला भन्साळीनं sanjayleela bhansali आता एक मोठी घोषणा केलीय. येत्या काही दिवसांत त्यांचा गंगुबाई काठियावाडी नावाचा चित्रपट येणार आहे. या बरोबरच त्यांनी एका महत्वकांक्षी प्रोजेक्टविषयीही प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. भन्साळी हे प्रथमच वेबसीरिजच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. त्यांनी आपण लवकरच एक वेबसीरिज web serise तयार करणार असल्याचे सांगितले आहे. प्रेक्षकांना आता त्यांच्या या मालिकेचे वेध लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून भन्साळी त्यांच्या या नव्या प्रोजेक्टवरुन सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

लक्ष वेधून घेणारे मोठे सेट्स, दमदार कथानकं आणि त्या पात्रांसाठी असणारी वेशभूषा यामुळे मोठ्या पडद्यावर भन्साळी यांचे चित्रपट पाहणे हा एक आनंददायी अनुभव असतो. त्यांच्या रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत, सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांची कमालीचा प्रतिसाद अनुभवला होता. आजही हे चित्रपट भन्साळी यांच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहेत. एखादी कथा आपल्याला आवडली तर त्या कथेच्या मागे लागुन ती पडद्यावर साकारण्यासाठी जीवापाड मेहनत घेणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये भन्साळींचे नाव घ्यावे लागेल.

भन्साळी आता चर्चेत आहेत ते त्यांच्या नेटफ्लिक्सवरच्या सीरिजमुळे. या ओटीटी माध्यमासाठी ते वेबसीरिज बनवणार असल्याची चर्चा आहे. ते येत्या वर्षात नेटफ्लिक्ससाठी हिरामंडी heeramandi नावाची वेबसीरिज तयार करणार असल्याचे सांगितले जात आहे. या सीरिजमध्ये लाहोरबरोबरच हिरामंडीदेखील दिसणार आहे. एका वेगळ्या विषयाला भन्साळी प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याविषयाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

sanjay leela bhansali
पब्लिसिटी स्टंट केला की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? जुही संतापली
sanjay leela bhansali
'सकाळ'च्या बातम्या; आजचं Podcast नक्की ऐका...

आपल्या नवीन मालिकेविषयी त्यांनी सांगितले की, हिरामंडी ही निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे. तो एक मैलाचा दगड आहे. ते एक महाकाव्य आहे. जे लाहोरच्या वेश्यांवर आधारित आहे. अशाप्रकारची ही पहिली सीरिज आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मी उत्साही आहे आणि जरा काळजी देखील वाटते ती यासाठी की मालिका विश्वात काम करताना जपून चालावं लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com