Sankarshan Karhade: अभिनेता संकर्षण कऱ्हाडेवर गुंडांकडून हल्ला..

संकर्षणने फोटो पोस्ट करत दिली महिती..
Sankarshan Karhade attacked by hooligan actor shared photo
Sankarshan Karhade attacked by hooligan actor shared photosakal

Sankarshan karhade: अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. संकर्षण कऱ्हाडे वर काही अज्ञात गुंडांनी हल्ला केला आहे. या बाबत अभिनेत्याने स्वतः पोस्ट करत माहिती दिली आहे.

अनेक मालिका, नाटक, चित्रपट या माध्यमातून आपल्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. तो सध्या 'महाराष्ट्राची किचन क्वीन' या कुकरी शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तसेच सध्या त्याच्या 'नियम व अटी लागू' आणि 'तू म्हणशील तसं' या नाटकांच्या प्रयोगात तो व्यक्त आहे. अशातच त्याच्या बाबतीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे

(Sankarshan Karhade attacked by hooligan actor shared photo)

संकर्षणने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हाताला मार लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याचा हात बँडेजने गुंडाळलेला आहे. तर कानात माईक आहे. त्याच्यामागे नाटकाचा पडदा आहे. त्यामुळे हा फोटो त्याने प्रयोगाच्या आधी काढलेला दिसतोय. पण त्याने जे कॅप्शन दिले आहे, ते चिंता व्यक्त करणारे आहे.

संकर्षणने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''परवा रात्री माझ्यावर ४ (चार) गुंडांनी हल्ला केला.. मी त्यांच्याशी २ (दोन) हात केले .. त्यात माझा १ (एक) हात जखमी झालाय.. ह्याची तुम्हाला ० (शुन्य) कल्पना होती म्हणुन हा फोटो पोस्ट करतोय..'' असे तो म्हणाला आहे. त्याच्या या पोस्ट ने माझी चिंता चांगलीच वाढवली आहे.

संकर्षणच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याची विचारपुस केली आहे. कुणी त्याला लवकर बरा हो.. असा सल्ला दिला आहे तर कुणी काळजीपोटी त्याची चौकशी करत आहे. एकाने तर 'तुला मिळत असलेल यश बघवत नसेल ..काळजी घ्या !!' असं म्हंटलं आहे.

पण अभिनेत्री स्पृहा जोशी कमेंट मात्र लक्ष वेधून घेणारी आहे. तिने 'मस्तच रे..' असे त्याच्या पोस्ट वर लिहिले आहे. त्यामुळे आता हा खरच अपघात आहे, संकर्षण कोणती घोषणा करणार आहे, याबाबत शंका निर्माण झाली आहे.

बऱ्याचदा कलाकार असे स्टंट करून एखादी घोषणा करतात त्यामुळे अनेकांनी संकर्षणच्या या पोस्टमागे नक्की काहीतरी वेगळा हेतु असेल असा अंदाज वर्तवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com