Sankarshan Karhade: संकर्षणने चालवली नाटकाची बस थेट लोणावळ्यापर्यंत.. प्रशांत दामलेंनी शेयर केला व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sankarshan karhade, prashant damle

Sankarshan Karhade: संकर्षणने चालवली नाटकाची बस, थेट लोणावळ्यापर्यंत.. प्रशांत दामलेंनी शेयर केला व्हिडिओ

Sankarshan Karhade Video Shared by Prashant Damle news: अभिनेता - लेखक संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो.

संकर्षणच्या मालिका, सिनेमे, नाटक प्रेक्षकांच्या आवडीचा विषय. याच संकर्षण कऱ्हाडेने एक खास गोष्ट केलीय ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

संकर्षण कऱ्हाडेने थेट नाटकाची बस चालवली आहे. संकर्षणचा हा व्हिडिओ थेट प्रशांत दामले यांनी शेयर केलाय.

(sankarshan karhade drive natak bus while prashant damle shared video)

प्रशांत दामले लिहितात.. काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बर वाटेनास झाल. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो.

पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली.

त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला.

इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालु आहेत. अशी पोस्ट प्रशांत दामले यांनी लिहिलीय.

संकर्षण सध्या तू म्हणशील तसं, नियम व अटी लागू अशा नाटकांमध्ये अभिनय करतोय. या नाटकांचे निर्माते आहेत प्रशांत दामले. प्रशांत दामले यांनी हा व्हिडिओ शेअर करत संकर्षणचं कौतुक केलंय.

एकंदर अभिनेता, लेखक, कवी असलेला संकर्षण प्रत्येक बाबतीत ऑल राउंडर आहे हेच यातून दिसतंय. या व्हिडिओवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.