संकर्षण कऱ्हाडेचा धमाकेदार कुकिंग शो | Sankarshan Karhade | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sankarshan Karhade

संकर्षण कऱ्हाडेचा धमाकेदार कुकिंग शो

झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक कार्यक्रम हा प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतो आणि त्यातील कलाकार हे देखील प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. असाच एक कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे Sankarshan Karhade. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. तो अभिनेता, कवी, लेखक अशा अनेक भूमिका निभावताना प्रेक्षकांना दिसतो, पण आता संकर्षण सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

झी मराठीवर 'किचन कल्लाकार' Kitchen Kallakar हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की, "आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार." यावरून तर असंच दिसतंय की पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचनमध्ये कस लागणार आहे. आता हे कलाकार किचनमध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

हेही वाचा: निलेश साबळेंनी नारायण राणेंची मागितली माफी; 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचा वाद

हा कुकींगशी संबंधीत शो पाहण्यासाठी सर्वंजण उत्सुक आहेत. या शोची रचना काय आहे, संकर्षणसोबत अजून या शोमध्ये कोण असणार याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र संकर्षणला या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

loading image
go to top