सपना चौधरीच्या भावाने केला तसला इशारा; युजर्स भडकले

sapna choudharys brother obsence gesture going viral
sapna choudharys brother obsence gesture going viral

हरियाणाची डान्सिंग क्वीन सपना चौधरी तिच्या डान्सच्या व्हिडिओंमुळे सतत चर्चेत असते. पण यावेळी सपना परत चर्चेत आली असली तरी दुसऱ्या कुणाच्यातरी चूकीमुळे. सपनाने एक टिकटॉक व्हिडिओ शूट केला आहे. ज्यात तिच्यासोबत असलेल्या मुलाच्या इशाऱ्यामुळे हा व्हिडिओ ट्रोल होत आहे. 

सपना 'आलतू जलालतू' गाण्यावर लिप सिंग करतानाचा व्हि़डिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सपनासोबत एक मुलगा दिसत आहे. तो तिचा भाऊ असल्याचे बोलले जात आहे. या मुलाने गाण्यातील लिरिक्सवर काही स्टेप केल्या आहे, जे आपत्तीजनक आहे. 

हा व्हिडिओ सपनाने इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. युजर्सनी सपनाला ट्रोल करत म्हटले आहे की, 'पैसा भल्या-भल्यांना बदलून टाकतो.' तर काहींनी म्हटले की, 'किती घाणेरडा इशारा केला या मुलाने. हा काय संदेश तुम्ही लोकांना देत आहात सपना? व्हिडिओ अपलोड करण्याच्या आधी बघायचं तरी मागे उभा असलेला मुलगा काय करतोय.. जर तुम्ही हा व्हिडिओ जाणीवपूर्वक अपलोड केला असेल, तर हे खूप चूकीचे आहे.'  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#sapnachoudhary #sapnachaudhary #tiktok

A post shared by DESI QUEEN (@isapnachaudhary) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com