IPL CSK Win: सारा दीदी बेवफा है.. शुभमन गिलची टीम हरल्यावर आनंद साजरा केल्याने सारा झाली ट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vicky kaushal, sara ali khan, zara hatke zar bachke, ipl final 2023, zara hatke zar bachke

IPL CSK vs GT: सारा दीदी बेवफा है.. शुभमन गिलची टीम हरल्यावर आनंद साजरा केल्याने सारा झाली ट्रोल

IPL CSK vs GT Sara Ali Khan Trolled News: सारा अली खान आणि विकी कौशल जे सध्या त्यांच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आहेत, ते काल अहमदाबादमध्ये आयपीएल फायनलची मॅच पाहायला आले. चेन्नई सुपर किंग्जने फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव केला आणि IPL २०२३ च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सारा गुजरात टायटन्समधील शुभमन गिलला डेट करत असल्याची चर्चा होती. शुभमनची GT फायनल मध्ये हरल्यावर सारा आनंदात उडी मारताना आणि CSK विजयाचा जयजयकार करताना दिसली. GT हरल्याबद्दल साराची आनंदवर्धक उत्साह पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

(Sara Ali Khan filled with joy after Shubman Gill's team loses, netizens joke 'Sara didi bewafa hai')

विकी कौशल आणि सारा अली खानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत CSK जिंकल्यावर विकी कौशलला सुखद धक्का बसला. अगदी त्याने डोक्यावर हात मारला. CSK चा असा विजय होणं हे विकी साठी नक्कीच अनपेक्षित होतं. सारा सुद्धा आनंदात टाळ्या वाजवत जल्लोष करत होती. CSK जिंकल्यावर स्टेडियममध्ये फटाक्यांची आतषबाजी झाली. सारा अली खानच्या आनंदाला उधाण आलं होतं.

नेटिझन्सने मात्र सारा अली खानच्या या प्रतिक्रियेवर तिला चांगलंच ट्रोल केलंय. एकाने कमेंटमध्ये लिहिले होते, “सारा दीदी बेवफा है.” दुसर्‍याने लिहिले, “सारा जेव्हा GT सिक्स मारत होती तेव्हा पण आनंदी होती आणि आता CSK जिंकली तेव्हा पण खुश है (जीटी षटकार मारत असतानाही सारा खूप आनंदी होती आणि सीएसके जिंकली तेव्हाही आनंदी आहे.” आणखी एक युजर म्हणाला, “साराने गिलशी गद्दारी केली.” दुसर्‍याने लिहिले, “गिल (शुभमन गिल)ची टीम हरली आणि सारा खूश आहे, याचा अर्थ नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाले आहे.” एका चाहत्याने असेही कमेंट केले की, “शुभमन गिल लवकर आऊट झाला. सारा अली खान, तिने आजच्या सामन्यात शुभमनच्या GT ला हरवले.”