'अब्बू ने अच्छी परवरिश..', महाकाल मंदिरात पूजा केल्यानंतर सारा अली खान पुन्हा ट्रोल Sara Ali Khan Trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Ali Khan Trolled:

Sara Ali Khan Trolled: 'अब्बू ने अच्छी परवरिश..', महाकाल मंदिरात पूजा केल्यानंतर सारा अली खान पुन्हा ट्रोल

Sara Ali Khan Trolled: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल त्यांच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दोघही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कसलीच कसर सोडतांना दिसत नाही आहे. नुकतेच दोघही आयपीएलच्या फायनल मॅचमध्ये पोहचले होते. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघही फिरतच नाही तर मंदिरांमध्ये जावुन पुजाही करत आहे.

या आधी सारा आणि विकी दर्शनासाठी लखनऊच्या एका शिवमंदिरात पोहोचले. यादरम्यान सारा अली खान आणि विकी कौशल मंदिरात भोलेनाथसमोर हात जोडून बसलेले दिसले.

सारा आणि विकी बुधवारी, 31 मे रोजी सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेले. तिथे भस्म आरतीला हजेरी लावली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये सारा अली खान महाकालसमोर हात जोडून डोक्यावर पदर घेवुन उभी असल्याचे दिसत आहे. पुजारीही तिला काही ना काही समजावताना दिसतात. साराचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ती भस्म आरतीमध्ये सहभागी होताना दिसत आहे आणि भक्तीत मग्न आहे.

मात्र, साराचे मंदिरात येणे काही लोकांना आवडले नाही आणि तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात येत आहे.

लखनौ मंदिरात साराच्या जाण्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे त्याचबरोबर तिला मंदिरात जाण्याची परवानगी कोणी दिली? असा सवालही नेटकरी विचारत आहे.

तर काहींनी सारावर टिकाही केली आहे. 'तुझं संगोपण योग्य झाले नाही, कदाचित त्यामुळेच तू मंदिरात हात जोडून बसली आहेस.' असं एकानं लिहिलयं

तर 'तुझे वडील मुस्लिम असून मंदिरात पूजा करतात. मला लाज वाटते, तुझे चांगले संगोपन व्हावे अशी माझी इच्छा आहे. असं म्हणत तिच्या सोबतच सैफलाही सुनावलं आहे.

सारा अली खान ही महादेवाची भक्त आहे. तिचा आणि शिवभक्तीशी विशेष संबंध आहे. 'केदारनाथ' हा तिचा पहिला चित्रपट होता ज्याने तिला बॉलिवूडमध्ये खूप ओळख मिळवून दिली.

आता सारा आणि विकी कौशलचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

या चित्रपटाची कथा एका कपलच्या लव्ह लाईफ आणि घटस्फोटाभोवती फिरते. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये साराने सौम्याची भूमिका केली आहे आणि विकीने कपिलची भूमिका केली आहे. ज्यातील दोन गाणी देखील रिलिज झाली आहे.