सारा अली खाननं फॅन्ससाठी सोडला आपला फीटनेस मंत्रा!Entertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सारा अली खान

फिटनेस फ्रीक सारा अली खान जेव्हा समोसा पाव खाते....

सारा अली खान ही इंडस्ट्रीत जेव्हा आली तेव्हा सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी एवढीच तिची ओळख होती. पण हळूहळू सारानं आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या विनम्र स्वभावाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. आजपर्यंत ती नेहमीच तिच्या फॅन्सशी सेलिब्रिटी अटिटयुड न ठेवता हसतखेळत बोलताना दिसली आहे. आणि त्यामुळेच सोशल मीडियावर तिच्या फॅन्सचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.

सोशल मीडियावर सध्या सारा अली खानचा एक व्हिडिओ वायरल होतोय. ज्यामध्ये विकी कौशल आणि सारा खान एका मिटिंगसाठी गेले होते. तिथे फॅन्सनी या दोघांना गाठलं. तेव्हा सारा तिच्या गाडीत बसली होती आणि अचानक एक फॅन्स तिथे समोसा-पाव घेऊन आला,तो ही साध्या पेपरमध्ये गुंडाळलेला. पण सारानं मात्र तो समोसा-पाव हसत-हसत स्विकारला आणि म्हणाली,' चलो दे ही दो'. समोसा पाव दिल्याबद्दल तिने फॅनचे आभारही मानले. साराच्या ह्या विनम्र वागणुकीमूळे सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सच्या माध्यमातून कौतूकाचा वर्षाव केला आहे. कुणी म्हटलंय 'सारा खूप गोड आहे',कुणी म्हटलंय 'अमृता सिंगने तिच्यावर खूप चांगले संस्कार केलेत' तर कुणी म्हटलंय,'साराला गोड खूप आवडतं आणि हेच तिच्या वागण्यातील गोडव्याचं प्रतिक आहे'.

सारा अली खान आणि विकी कौशलला गेल्या काही दिवसांत अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलंय. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी सिनेमात ते एकत्र काम करतायत अशी बातमी आहे. लुका छूपी आणि मिमी या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.

loading image
go to top