Sara Tendulkar : ऐकलंत का? सारा कुणाला तरी खूप मिस करतेय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Tendulkar

Sara Tendulkar : ऐकलंत का? सारा कुणाला तरी खूप मिस करतेय!

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हा एक चर्चेतील चेहरा ठरतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे फोटो आणि आपल्या आवडी निवडी शेअर करत सारा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. दिवसागणिक त्यात भर पडताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टची जोरदार चर्चा रंगली होती.

याचे कनेक्शन लोकांनी भारतीय युवा क्रिकेटर शुबमन गिलच्या सोशल पोस्टशी कनेक्ट केलं होते. सारा आणि शुबमन गिल यांनी जी पोस्ट शेअर केली होती त्यात बीच हा कॉमन फॅक्टर होता. यावरुन ही दोघ एकत्र आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहे. पण दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया कधीच दिलेली नाही.

ही पोस्ट चर्चेत असताना आता तिने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून कुणाला तरी मिस करत असल्याची कहाणी शेअर केलीये. यावरही अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. आता तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल ती कुणाला मिस करतेय. तुम्हाला आता तिची इन्स्टा स्टोरी दिसणार नाही. पण साराने खुद्द स्टोरीच्या माध्यमातून यासंदर्भातील गोष्ट शेअर केली होती.

मॉडल झाली अन्...

सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) मॉडेलिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. कपड्यांच्या ब्रँडसाठी तिने फोटोशूट केले. या प्रोजक्टमध्ये सेलिब्रेटी बनीता संधु (Banita Sandhu) आणि तानिया श्रॉफ (Tania Shroff) यांचाही सहभाग होता. मॉडेलिंगसाठी साराला लांब केसांना कात्री लावावी लागली. त्या केसांनाच ती मिस करतेय. सारा तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी तिचा मॉडेलिंगचा फोटो शेअर केला होता. यात तिने लांब लचक केस कापल्याचे दिसून आले होते. त्यानंतर साराने 7 जानेवारीला आपल्या इन्स्टास्टोरीवर एक जुना फोटो शेअर केला होता. यात तिने लांब केसांना मिस करतोय असे म्हटले होते.

हेही वाचा: सारा तेंडुलकर, शुभमन गिलने शेअर केले बीच फोटो; काय आहे भानगड?

बॉलिवूडमध्ये एन्ट्रीची अफवा

जसे सारा तेंडुलकरने मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवले तसे तिच्याबद्दल अनेक गोष्टींबाबत चर्चा सुरु झाली. त्यातील एक चर्चा होती ती म्हणजे ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणार आहे. पण अद्याप कोणत्याही बॉलिवूड व्यावसायिकाने अथवा साराच्या कुटुंबियांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार हे तुर्तास तरी एखाद्या अफवेसारखेच आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top