आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमारचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांनी केलं ट्विट
मुंबई- बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सिनेमांव्यतिरिक्त लोकांची मदत करण्यासाठी देखील चर्चेत असतो. कोरोनाच्या काळात या संसर्गाशी सामना करण्यासाठी अक्षयने अनेकप्रकारे मदत केली आहे. आता अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो आसाममधील पूरामुळे..
अभिनेता अक्षय कुमार आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्याने या असहाय्य पूरग्रस्तांना आर्थिक पाठबळ दिलं आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सगळ्यात जास्त या पूराचा फटका बसतोय ती आसाम आणि बिहार या राज्यांना. या राज्यातील लोकांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. अशातंच अक्षय कुमारने त्यांच्यासाठी १ कोटी रुपयांची मदत केली आहे. याबाबतची माहिती स्वतः आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मिडियावरुन दिली आहे.
आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिलंय, 'अक्षय कुमारजी आसाम पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांचं योगदान दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही नेहमीच संकटकाळी सहानुभूती आणि समर्थन दर्शवलं आहे. आसामचा एक खरा मित्र म्हणून तुमच्यावर सदैव देवाचा आशिर्वाद असू दे. '
सोशल मिडियावर सर्बानंद सोनोवाल यांचं हे ट्विट व्हायरल होतंय. अक्षय कुमारचे चाहते या ट्विटवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. अक्षय कुमारने कोरोच्या काळात वेगवेगळ्या प्रकारे मदतीचा हात पुढे केला होता. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांमधील कोविड-१९ च्या लक्षणाची लवकर माहिती मिळावी यासाठी खास १२०० स्मार्ट रिस्टबँड्स भेटवस्तू म्हणून दिले होते.
sarbananda sonowal praises akshay kumar for donate one crore rupees in assam flood relief
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.