sasural simar ka fame actor ashish roy passed away
sasural simar ka fame actor ashish roy passed away

'ससुराल सिमर का' मधील अभिनेता आशिष रॉय यांचे निधन

मुंबई - 'ससुराल सिमर का' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेता आशिष रॉय यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त झाले होते. त्यावर त्यांनी उपचारही केले. मात्र त्याला यश आले नाही. अखेर 55 वर्षे वयाच्या अभिनेत्याच्या जाण्याने टेलिव्हीजनवरील मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या निधनाची बातमी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील कलावंत तसेच ससुराल सिमर या मालिकेतील रॉय यांचे सहकलाकार जयती भाटिया यांनी दिली. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत पोस्ट शेयर केली आहे. आशिष रॉय हे त्यांच्या प्रकृती अस्वस्थेबद्दल चर्चेत आले होते. आपल्या आजारपणासाठी चाहत्यांनी मदत करावी असे आवाहनही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते.

रॉय यांच्या निधनाचे वृत्त कळताच भाटिया यांनी रॉय यांच्या समवेतचा एक फोटो व्हायरल केला आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, आपण आम्हा सर्वांना खूप प्रेम दिले. तुम्ही माझ्यासाठी नेहमीच एखाद्या बाँड सारखे होते. आणि राहाल. तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली.त्या मालिकेतील कलाकार टीना घई यांनीही रॉय यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्हा सर्वांना खूप दु;ख झाले आहे. सध्या त्यांचे मृत्युपत्र घेण्याकरिता वाट पाहावी लागत आहे. त्यांचे निधन घरी झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असणा-या रॉय यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते, ठराविक दिवसांनी मला रुग्णालयात तपासणीसाठी जावे लागते. तिथे मला तीन तास डायलिसीससाठी लागायचे. आणि दोन हजार रुपये खर्च होता. एकवेळ अशी होती की, मला असे वाटायचे मी आता फार काळ जगणार नाही. मात्र डायलिसीसमुळे ते शक्य झाले. 
 जगण्यासाठी शेवटपर्यत आशावादी होतो. त्य़ामुळे जगलो.

डायलिसीस सुरु असल्याने आणखी काही दिवस मिळाले. माझ्या शरीरात आणखी पाणी आहे. वेळेनुसार मी यापेक्षाही चांगल्या स्थितीत असेल अशी अपेक्षा मला आहे. बरा होईल असे वाटते. असे मत रॉय यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com