'एक डायरेक्टर की मौत!' प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता का म्हणाले असं? |Satish Kaushik Death | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Kaushik Death Hansal Mehta Bollywood Director

Satish Kaushik Death : 'एक डायरेक्टर की मौत!' प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता का म्हणाले असं?

Satish Kaushik Death Hansal Mehta Bollywood Director : आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्वानं आणि प्रभावी अभिनयानं चाहत्यांना नेहमीच जिंकून घेणारे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे जाणे चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाणारे ठरले आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली आहे.

कौशिक यांचे जाणे बॉलीवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांसाठी मोठा धक्का आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर आपल्या जिगरी मित्राबद्दल व्यक्त केलेल्या भावना भावूक करणाऱ्या आहेत. अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील इंस्टावर पोस्ट शेयर करत दिलेल्या प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

केवळ अभिनेताच नाही तर दिग्दर्शन, निर्माता, पटकथाकार अशा वेगवेगळ्या भूमिकेतून कौशिक यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले होते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा बॉलीवूडवर उमटवला होता. आता त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला असून चित्रपट विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशातच सोशल मीडियावर व्हायरल सेलिब्रेटींच्या व्हायरल झालेल्या प्रतिक्रियांनी कौशिक यांच्या बद्दलच्या वेगवेगळया आठवणींना उजाळा मिळाला आहे.

मेहता यांनी कौशिक यांचा फोटो पोस्ट करत त्यावर भावूक कॅप्शन लिहिली आहे. एका दिग्दर्शकाचा मृत्यु असे म्हटले आहे. मला त्यांच्यावर डेथ ऑफ अ डायरेक्टर नावाची फिल्म करायची होती. आता तसे होणे शक्य नाही. याचे फार वाईट वाटते. असे मेहता यांनी म्हटले आहे.त्यांच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत. कौशिक यांच्या अभिनयाचे, त्यांच्या मोठ्या व्यक्तिमत्वाचे आणि दिलखुलासपणाचे जेवढे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. माझ्या पुढील चित्रपटामध्ये कौशिक यांच्या नावानं एक झाड दिसेल. अशी भावूक प्रतिक्रिया मेहता यांनी दिली आहे.

कौशिक तुम्ही फार लवकर गेलात, माहिती नाही पण तुमची नेहमीच आठवण येत राहिल. तुमची क्रिएटिव्हीटी, तुमची भूमिका, अभिनय हे सारं प्रभावित करणारं होतं. आयुष्याकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन हे खूप प्रभावित करणारं होतं. असंही मेहता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.