भयपट 'सविता दामोदर परांजपे'चा ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

'सविता दामोदर परांजपे' या नाटकात दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांनी मुख्य पात्रं साकारले होते. आता तेच मुख्य पात्रा सिनेमात तृप्तीने 'सविता' हे मुख्य पात्रं साकारले आहे. 

मुंबई : 'सविता दामोदर परांजपे' या गाजलेल्या नाटकावर आधारीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचे नावही 'सविता दामोदर परांजपे' असेच आहे. नुकताच या भयपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने या सिनेमाची निर्मिती केली आहे. अभिनेता सुबोध भावे, राकेश बापट आणि ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची मुलगी तृप्ती तोरडमल यांची सिनेमात प्रमुख भुमिका आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 

शरद आणि कुसुम अभ्यंकर या विवाहीत जोडप्याच्या आयुष्यात भीतीचं सावट येतं आणि या जोडप्याचा संघर्ष येथून सुरु होतो. 1980 चा काळ सिनेमातून साकारण्यात आला आहे. 'सविता दामोदर परांजपे' या नाटकात दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांनी मुख्य पात्रं साकारले होते. आता तेच मुख्य पात्रा सिनेमात तृप्तीने 'सविता' हे मुख्य पात्रं साकारले आहे. 

31 ऑगस्टला हा थरकाप उडवणारा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पल्लवी पाटील, अंगद म्हसकर यांच्याही सिनेमात भुमिका आहेत.   


 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Savita Damodar Paranjape Movie Trailer Lauched