लग्नाला यायचं हं! सायली संजीवचा 'बस्ता' लवकरच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

लग्नसमारंभात लग्न जमवण्यापासून ते वरातीपर्यंत अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यात खरेदीचा भाग वेगळाच असतो. यातलाच महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे लग्नाचा बस्ता. वधु-वरांची कपडे, त्यांच्या कुटुंबियांचे आहेर इत्यादीची खरेदी यामध्ये केली जाते. याच लग्नाच्या बस्त्यावर आता एक चित्रपट येणार आहे. एका लग्नाच्या बस्त्याची गोष्ट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बस्ता हा चित्रपट 29 जानेवारीला झीफ्लेक्सवर प्रदर्शित होणार आहे. वर्षा मुकेश पाटील आणि सुनिल फडतरे यांची निर्मिती असलेल्या बस्ता चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.  सायली संजीवसह अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. पोस्टरमध्ये वधुच्या खुर्चीत मुंडावळ्या बांधून सायली संजीव दिसत आहे. चित्रपटाचं लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन केलं असून संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

'वायफळ चर्चा, कंगणाचं व्टिटरनं अकाऊंट केलं बंद'

शेतकरी असलेल्या वडिलांचा भावनिक प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. मुलीचं लग्न सुखाने पार पडलेलं पाहायचं त्याचं स्वप्न आहे. यातून आनंदाचे आणि हळवे क्षण आहेत. झीप्लेक्ससारखा प्लॅटफॉर्म मिळाल्याचा मला आनंद झाला आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा हा उत्तम मार्ग आहे." असे या चित्रपटाचे दिग्दर्शक तानाजी घाडगे म्हणाले. 

'अमिताभ यांनी शब्द टाकला, पोलीस पत्नीची बदली झाली' 

सायली संजीव ही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या आधी पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी, सातारचा सलमान या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. तसंच झी मराठी वरील काहे दिया परदेस या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sayali sanjiv upcoming marathi movie basta