esakal | ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'तसलं काही' नकोच; सर्वोच्च न्यायालय 
sakal

बोलून बातमी शोधा

 sc worried over Offensive content on ott platforms  says screening required

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा कंटेट आता त्याच्या परिक्षणाची गरज आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'तसलं काही' नकोच; सर्वोच्च न्यायालय 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिध्द होणा-या कंटेटविषयी चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्याच्यावर काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं काही आक्षेप घेतले आहे. आतापर्यत ओटीटी माध्यमातून जे चित्रपट अथवा वेबसीरिज प्रसिध्द झाले आहेत त्यातील काही दृश्यांना प्रेक्षकांनी हरकत घेतली होती. विशेषत, लैंगिकतेचे ज्याप्रकारे सादरीकरण केले गेले आहे त्याची तीव्रता अधिक असून त्यावर निर्बंध आणण्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जाऊ लागली आहे. अखेर त्यावर न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा कंटेट आता त्याच्या परिक्षणाची गरज आहे. स्क्रिनिंग केल्याशिवाय यापुढील काळात तो प्रसिध्द होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी असे निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. कधी कधी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफीही दाखवली जाते. त्यामुळे बालमनावर परिणाम होतो. त्यामुळे या माध्यमावर काही बंधने आणण्याची गरज आहे. म्हणून आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्राच्या एका समितीचे लक्ष असणार आहे.

भाईजानचा 'राधे' 235 कोटींना विकला; 14 मे ला होणार प्रदर्शित

याप्रकरणी पुढील सुनावणी ही उद्या होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना अपर्णा पुरोहित आणि मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्मचे जे काही नियम आहेत ते आता नव्यानं आले आहेत. त्याचे झाले असे की. तांडव नावाच्या एका वेबसीरिजनं हिंदू देवतांचे ज्याप्रकारे चित्रण केले त्यातून प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे काही हिंदु संघटना आणि राजकीय पक्ष यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर निर्माते आणि दिग्दर्शक यांना माफी मागायला लावली होती. 

'आम्हाला वादाची सवयचं आहे'; आयकरचा पडला छापा

त्या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक अली अब्बास, हिमांशु कृष्ण मेहरा आणि लेखक गौरल सोळंकी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीनं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते की, थोड्याच दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मविषयीच्या नवीन गाई़डलाईन्स येणार आहेत. 
  

loading image