
मुंबईतलं अक्षय कुमारचं नवीन घर पाहिलंत का?
बॉलीवूडमध्ये सध्या ज्याचे सिनेमे प्रदर्शित झाले की ते चालतातच आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवर खोऱ्याने पैसा ओढतात असा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार(Akshay Kumar). कॉमेडी,थ्रीलर,अ्ॅक्शन,रोमॅंटिक किंवा अगदी हॉरर जॉनरच्या सिनेमालाही अक्षयच्या अभिनयाचा स्पर्श झाला की सिनेमाचं भलंच होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अक्षयनं बॉलीवूडमध्ये नाव आणि पैसा दोन्ही बक्कळ कमावलाय. अर्थात मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या अक्षयनं रीतसर स्ट्रगल करून आपल्या मनेहनतीच्या जोरावर सगळं करून दाखवलंय. आज त्यानं आपल्या कष्टानं कमावलेल्या पैशावर बरीच प्रॉपर्टी अगदी मॉरिशसपर्यंत उभी केलीय. नुकतीच त्याच्या बाबतीत एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे म्हणजे त्याच्या नवीन घराची. मुंबईत त्यानं एक नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. ज्याची किंमत कोट्यावधींमध्ये आहे.

Akshay Kumar's New Home in Mumbai. Sample Flat Images from Official website
2021च्या डिसेंबरमध्ये अक्षय कुमारनं अंधेरी पश्चिम येथील त्याचे ऑफिस ९ कोटीला विकल्याचं वृत्त होतं,पण अद्यापतरी याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यातच आता बातमी येतेय की अक्षयने ते ऑफिस विकल्यानंतर आलेल्या पैशातूनच हे नवीन घर खरेदी केलं आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार,अक्षय कुमारने एक नवीन फ्लॅट खरेदी केला आहे आणि या नवीन आलिशान फ्लॅटची किंमतही खूप जास्त आहे. रिपोर्टनुसार त्याच्या या नवीन फ्लॅटची किंमत 7.8 कोटी इतकी आहे. त्याचा हा नवीन फ्लॅट खार पश्चिम येथील जॉय लिजेंड बिल्डिंगच्या 19 व्या मजल्यावर असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच त्याला तेथे चार कार पार्किंगची जागा मिळाली आहे. अक्षय कुमारचे हे नवे घर कसे दिसत असेल याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये मात्र उत्सुकता असणार यात शंकाच नाही.
हेही वाचा: पावनखिंडीच्या रक्तरंजीत इतिहासातल्या या गोष्टी माहिती आहेत का?
या इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिशिअल साइटवरून फ्लॅटचे काही सॅम्पल फोटो बातमीत जोडत आहोत. बोललं जातंय की अक्षयचं हे नवं घर हुबेहूब असंच दिसत आहे. याबाबत अधिकृतपणे अद्याप अक्षयकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. पण खात्री आहे अक्षय किंवा ट्विंकल लवकच आपल्या या नव्या घरकुलाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करतील. अक्षयचा नुकताच 'अतरंगी रे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात त्याच्यासोबत धनुष आणि सारा अली खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. अक्षयच्या सिनेमांची यादी भलीमोठी आहे. पृथ्वीराज,सेल्फी,मिशन सिंड्रेला,रामसेतू,बच्चन पांडे,रक्षाबंधन,गोरखा,ओएमजी २ अशा सिनेमात तो वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे.
Web Title: See Pics Of Akshay Kumars New 78 Crore Mumbai Flat With Four Car Parking Spaces Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..