Selfiee: अजून साउथला कॉपी करा, तोंडावर पडा! सेल्फी, शहजादाला प्रेक्षकांनी शिकवला धडा..विश्लेषक म्हणतात,.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

selfie and shehzada bollywood movies flop

Selfiee: अजून साउथला कॉपी करा, तोंडावर पडा! सेल्फी, शहजादाला प्रेक्षकांनी शिकवला धडा..विश्लेषक म्हणतात,..

गेल्या काही दिवसांपासून शाहरुखच्या पठाणच्या कमाईचे आकडे पाहिल्यानंतर बॉलिवुडवरील फ्लॉप चित्रपटाचं आणि बॉयकॉटचं वारं सावरलं असं काहीस चित्र दिसतं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील सर्वच रेकॉर्ड तोडले. आधी वादाच्या भोवऱ्यात अडकेलेल्या या चित्रपटानं रिलिज झाल्यानंतर बरीच दहशत निर्माण केली.

34 दिवसांत पठाणने जगभरात 1000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे आता बॉलिवुडला अच्छे दिन आल्याचं सर्वांना वाटलं. मात्र तसं काहीसं चित्र दिसत नाही आहे. कारण पठाण नंतर बॉलिवूडमधुन दोन मोठ्या स्टारचे चित्रपट रिलिज झाले आणि ते बॉक्स ऑफिसवर जोरात आपटले आहेत.

अक्षय कुमार-इमरान हाश्मीचा सेल्फी असो किंवा कार्तिक आर्यनचा शहजादा. दोन्ही चित्रपट सुपर फ्लॉप ठरले. अखेर बॉक्स ऑफिसवर पुन्हा बुरे दिन आले आहेत का ? एवढ्या मोठ्या आणि लोकप्रिय स्टार्सचे चित्रपट असूनही हे चित्रपट फ्लॉप का झाले?असा सवाल पुन्हा उपस्थित होत आहे.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते शहजादा हा अला वैकुंठपुरमलो चा रिमेक होता तर अक्षयचा सेल्फी हा साउथच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा रिमेक. हे दोन्ही दक्षिण चित्रपटांचे रिमेक होते. जे दर्शकांनी आधीच पाहिले आहे.

त्यांच्या मते आजकाल रिमेक लोकांना आवडतं नाहीत. त्यांना साउथ चित्रपटांची स्वस्त कॉपी म्हटलं जातं. रिमेकसाठी प्रेक्षकांमध्ये बरीच नकारात्मकता पाहायला मिळत आहे.

दुसरे कारण म्हणजे, शहजादा आणि सेल्फीचा ट्रेलरही लोकांना आवडेलेला नाही. या दोन्ही चित्रपटांच्या ट्रेलरनेही लोकांमध्ये काहीच उत्सूकता नव्हती. त्यामुळेच चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरत आहेत. दोन्ही चित्रपटांची कथा आणि रिमेक खुप कमकुवत होते. चित्रपटाचे प्रमोशन करुनही हे चित्रपट फारशी कमाल करु शकले नाही.

तर काही तज्ञांच्या मते, बॉक्स ऑफिसचा इतिहास जर पाहिला तर असा आहे की जर एखादा चित्रपट बंपर हिट होतो. तर त्यानंतर प्रदर्शित झालेले चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकत नाहीत. बंपर हिट झाल्यानंतर, बॉक्स ऑफिसवर एक अंतर दिसून येते जेथे चित्रपट काही आठवडे किंवा महिने फारशी चांगली कामगिरी करु शकत नाहीत.