
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रच्या घर बॉम्बनं उडवण्याची धमकी! एका फोन कॉल अन् मुंबई पोलिसांचं धाबंच दणाणलं
बॉलिवुडमधील दिग्गज अभिनेते ज्यांनी अभिनयानं मनोरंजन क्षेत्राला वेगळीच ओळख निर्माण करुन दिली असे अभिनेते अमिताभ बच्चन,अभिनेते धर्मेंद्र यांच्या संदर्भात एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
एका अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन,अभिनेते धर्मेंद्र आणि देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह अनेक मान्यवरांची घरे बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे .
हा फोन कॉल आल्यानंतर एकच गोंधळ उडालेला आहे. याप्रकरणी तात्काळ नागपूर पोलिसांनी सर्व माहिती मुंबई पोलिसांना दिली.
ज्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलिसांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिली होती त्या ठिकाणी बॉम्बशोधक पथक पोहोचले आहेत. पोलिसांनी शोधमोहीमही सुरू केली आहे.
याशिवाय त्या अज्ञात व्यक्तीने 25 लोक दादरला पोहोचले असून ते हल्ल्याची योजना आखत असल्याची धमकीही दिली. या फोन कॉलनंतर नागपूर पोलीस याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची तयारी करत आहेत.
आत सर्व यत्रंणा या प्रकरणाचा तपास करत असून ही खोटी धमकी आल्याचं बोललं जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मुकेश अंबानींना धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही ऑगस्ट २०२२ मध्ये अँटिलियाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती.
Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
कालच, सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देशभरात आणि परदेशात सर्वोच्च दर्जाची Z+ सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अभिनेते अमिताभ बच्चन , अभिनेते धर्मेंद्र यांच्या सुरक्षिततेसाठी शासन काय पाउल उचलते हे पाहणेही महत्वाचे ठरेलं.