प्रतिभावंत कलाकारांसाठी सुशांतच्या नावाने ट्रस्ट उभारणार; कुटूंबियांचा प्रेरणादायी निर्णय

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 28 June 2020

चित्रपट, विज्ञान आणि क्रीडा यामध्ये तरुण प्रतिभांना सर्वोतोपरी मदत करेल.
याशिवाय बिहारमधील पटनाच्या राजीव नगर येथील बालपण घालविलेले घर हे त्याच्या आठवणींचे स्मारक बनविण्यात येणार आहे .

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी एक मोठा आणि अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सुशांतच्या नावाने एका ट्रस्टची स्थापना करण्यात येणार आहे. सदर ट्रस्ट हे सुशांतच्या आवडीचा विषय असलेल्या चित्रपट, विज्ञान आणि क्रीडा यामध्ये तरुण प्रतिभांना सर्वोतोपरी मदत करेल.
याशिवाय बिहारमधील पटनाच्या राजीव नगर येथील बालपण घालविलेले घर हे त्याच्या आठवणींचे स्मारक बनविण्यात येणार आहे . या ठिकाणी त्याच्या तमाम चाहत्यांसाठी सुशांतच्या व्यक्तिगत वस्तू ठेवण्यात येणार आहेत. त्यात सुशांतची विविध विषयांवरील पुस्तके, त्याचा टेलिस्कोप, फ्लाईट सिम्युलेटर आदींचा सहभाग असेल.

मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

सोशल मीडिया अकाउंट्स कुटुंबीय हाताळणार

सुशांतच्या परिवारातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की त्याचे कुटुंबीय सुशांतचे इंस्टाग्राम, फेसबुक व ट्विटर हाताळणार आहेत. त्याद्वारे सुशांतच्या आठवणींना सर्वांच्या हृदयात कायमस्वरूपी ठेवण्यात येणार आहे. कुटुंबीयांनी मेसेजमध्ये म्हटले आहे की, सुशांतचा स्वभाव मनमिळाऊ होता, त्याला सर्व
बाबींमध्ये जिज्ञासा असे. तो नेहमी स्वप्ने बघत असे व त्या स्वप्नांचा पाठलाग करीत असे. सुशांत आमच्यासाठी अभिमान आणि आदर्श होता .

अपारशक्ती खुरानाने दाखवली झलक, कोरोनानंतर असे शूट होतील रोमँटीक सीन...

सुशांतची कमतरता कधीही भरून न येणारी

कुटुंबियांकडून मेसेजमध्ये काही बाबी अत्यंत हृदयद्रावक अशा लिहिल्या असून त्यात सुशांतचे अकाली सोडून जाणे ही आम्हा सर्वांची मोठी हानी असून ती कधीही भरून येणार नाही. आता कोणीही त्याचा हसरा आवाज पुन्हा ऐकू शकणार नाही. आजवर त्याच्यावर केलेल्या प्रेमाची कधीही परतफेड होऊ शकत नाही. पण त्याच्या वरील निस्सीम प्रेमासाठी आभार, या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To set up a trust in the name of Sushant for talented artists; Inspiring family decisions