Shabana Azmi: जावेद अख्तरांशी लग्न करण्यासाठी वडिलांशी घेतला पंगा!

प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी आणि ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांच्या लवस्टोरीची नेहमीच चर्चा होत असते.
Shabana Azmi
Shabana Azmi esakal

Bollywood Actress Shabana Azmi: बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या अभिनेत्रींमध्ये शबाना आझमी यांचे नाव घेतले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे, विषयांवरील चित्रपटांमधून शबाना (Bollywood celebrity) यांनी चाहत्यांची पसंती मिळवली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या अंकुर या चित्रपटापासून शबाना (viral social media news) आझमी यांचा बॉलीवूड प्रवास सुरु झाला. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तो सुरु आहे.

अशी कोणतीही भूमिका नाही जी शबाना आझमी यांनी केली नाही. नाट्य, चित्रपट, टीव्ही मालिका आणि आता ओटीटीवरही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. शबाना आझमी यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये त्यांचे चाहते आहेत. बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केलेल्या आझमी यांच्या लवस्टोरीची नेहमीच चर्चा होत असते. असं म्हटलं जातं की, जेव्हा त्यांच्या आणि जावेद अख्तर यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा त्यांचे वडील प्रसिद्ध शायर कैफी आझमी यांच्या कानावर गेली तेव्हा त्यांना खूप राग आला होता.

शबाना आझमी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी हैद्राबादमध्ये झाला. 70 च्या दशकांतील सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. शबाना आझमी यांची लवस्टोरी ही त्यांच्या घरापासूनच सुरु झाली होती. जावेद अख्तर हे कैफी आझमी यांच्या कविता ऐकण्यासाठी शबाना यांच्या घरी यायचे. कविता ऐकता ऐकता जावेद अख्तर आणि शबाना यांच्यातील मैत्रीचे नाते दृढ झाले. त्या मैत्रीला प्रेमाचा रंग येऊ लागला.

शबाना आणि जावेद अख्तर यांच्या नात्याविषयी शबाना यांच्या घरच्यांच्या मनात नाराजी होती. जावेद अख्तर हे विवाहित होते. आणि त्यांना दोन मुलंही होती. त्यामुळे शबाना अशा माणसाच्या प्रेमात वाहत जाऊ नये. असे शबाना यांच्या वडिलांना वाटत होते. त्यावरुन त्यांच्या घरात वाद होऊ लागले. मात्र काहीही झालं तरी आपण जावेद अख्तर यांच्याशीच लग्न करायचे यावर शबाना आझमी ठाम होत्या. त्यासाठी त्यांनी वडिलांशी भांडणं केलं. त्यांचा राग ओढावून घेतला.

Shabana Azmi
Bramhastra: आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'पुढं सारं फिकं! ती जिंकली

पुढे जावेद अख्तर यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सात वर्षांनी घटस्फोट दिल्यानंतर 1984 मध्ये आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान शबाना आझमी यांच्याशी लग्न केले. बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून या दोन्ही कलाकारांकडे पाहिले जाते. जावेद अख्तर हे प्रख्यात गीतकार असून एकेकाळी सर्वोत्कृष्ट पटकथाकार म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली आहे.

Shabana Azmi
Sara Ali: साराचं 'शुभमन' फिल! 'डेटिंग' रंगलंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com