Shah Rukh Khan: चाहत्यांसाठी बुक केलं '5 स्टार' हॉटेल, जेवू घातलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan: चाहत्यांसाठी बुक केलं '5 स्टार' हॉटेल, जेवू घातलं!

Shah Rukh Khan Bollywood King Khan: बॉलीवूडच्या किंग खानची गोष्टच वेगळी आहे. त्याचा तोरा काही औरच आहे. त्याच्या घरासमोर चाहत्यांची शेकडोंच्या संख्येनं असलेली गर्दी खूप काही सांगून जाते. जेव्हा किंग खानच्या मुलाचं म्हणजे आर्यन खानचं ते ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं तेव्हा चाहत्यांनी शाहरुखला मोठा आधार दिला होता. सतत आठवडाभर त्याच्या घरासमोर चाहत्यांची गर्दी असायची. लव यू शाहरुख, तू काळजी करु नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत. अशी त्यांची प्रतिक्रिया होती.

शाहरुखही आपल्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या चाहत्यांवर मनापासून प्रेम करतो हे दिसून आले आहे. एखादा अभिनेता चाहत्यांसाठी काय करु शकतो हे शाहरुखकडे पाहून कळते. त्याला चेन्नईमध्ये काही फॅन्स भेटले. त्यानं त्यांच्यासाठी फाईव्ह स्टार रुम्सही बुक केल्या. त्यांना रात्री जेवूही घातलं. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांना नाराज न करता त्यांच्या अभिवादनाचा स्विकार करण्यात शाहरुखचे नाव पहिल्यांदा घ्यावे लागेल.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख हा गेल्या एका महिन्याासून चेन्नईमध्ये आहे. तिथे त्याच्या जवान नावाच्या चित्रपटाची शुटींगही सुरु आहे. त्या चित्रपटामध्ये विजय सेतूपती, नयनतारा आहेत. त्याचे दिग्दर्शन अॅटली हे करणार आहेत. त्याच्या टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. शाहरुखच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. चेन्नईमधील शुटींग संपवून शाहरुखनं त्याच्या चाहत्यांची भेट घेतली. एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, माझे चाहते हेच माझे खरे मित्र आहेत.

हेही वाचा: Double XL Trailer: 'मुलांना ब्रा मोठी हवी पण कंबर बारीक'!

शाहरुखच्या काही चाहत्यांनी त्या मुलाखतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्या पोस्टला देखील नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्या भेटीपूर्वी फोनवरुन सांगण्यात आले होते की, शाहरुख तुमची भेट घेणार आहे. ते ऐकून चाहते आनंदित झाले होते.

हेही वाचा: Allu Arjun: 'इंडिया कभी झुकेगा नहीं' म्हणताना 'पुष्पा'च्या डोळ्यात होतं पाणी!