OTT Platform : शाहरुख खान वेब सिरीजद्वारे डिजिटल पदार्पण करणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan Latest News

OTT Platform : शाहरुख खान वेब सिरीजद्वारे डिजिटल पदार्पण करणार?

Shah Rukh Khan Latest News ब्रह्मास्त्र चित्रपटात शाहरुख खानला (Shah Rukh Khan) छोट्या भूमिकेत पाहून चाहते खूप खूश आहेत. या चित्रपटातील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाहरुखचा हा सीन चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सीन असल्याचे चाहते सांगत आहेत. किंग खान पुढच्या वर्षी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २०२३ मध्ये त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय शाहरुख डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही भेटवस्तूपेक्षा कमी नसेल.

तुम्हाला आठवत असेल तर शाहरुख खानने गेल्यावर्षी डिस्ने प्लस हॉटस्टारचा प्रोमो केला होता. प्रोमो पाहिल्यानंतर सर्व अटकळांना सुरुवात झाली. रिपोर्टनुसार, शाहरुख डिस्ने प्लस हॉटस्टारसाठी वेब सिरीज करणार आहे. हे त्याचे डिजिटल पदार्पण असेल. सुपरस्टारने एका वेब सिरीजवर स्वाक्षरी केली आहे. जी प्लॅटफॉर्मवर येईल. वेब सिरीजबद्दलचा (Web Series) अधिक तपशील सध्या गुप्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: ...अन् कंगना राणावत फसली; गोमांस खाल्याची जुनी मुलाखत व्हायरल

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) प्रोमो व्हिडिओ शेअर करताना करण जोहर म्हणाला होता, ‘बॉलिवूडचा बादशाह खान इतका खळबळ उडवून देईल, असे कधीच वाटले नव्हते. आता मी काहीही बघायला तयार आहे.’ यावर शाहरुखने ट्विट केले की, ‘हम्म... पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त’

आगामी चित्रपट

शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत पठाण चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे जवान आणि डिंकी हे चित्रपटही आहेत.

Web Title: Shah Rukh Khan Digital Debut Web Series Ott Platform

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..