...अन् कंगना राणावत फसली; गोमांस खाल्याची जुनी मुलाखत व्हायरल

गोमांसात काहीतरी असावे जे आईने खाण्यास मनाई केली आहे
Kangana Ranaut Latest News
Kangana Ranaut Latest NewsKangana Ranaut Latest News

Kangana Ranaut Latest News अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी बीफ खाल्ल्याची कबुली दिली आहे. कंगना राणावत (Kangana Ranaut) देखील त्यापैकी एक आहे. अनेक वर्षांपूर्वी तिने मांसाहार सोडला, हे विशेष... रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटावर बहिष्कार टाकल्याने कंगनाचे वक्तव्य आणि बीफ खाण्याबाबतचे ट्विट सोशल मीडियावर युजर्स व्हायरल करीत आहेत.

कंगना राणावत (Kangana Ranaut) स्वतःला सनातनी म्हणते. तिने सोशल मीडिया आणि मुलाखतींमध्ये सांगितले आहे की तिचे आयुष्य खूप बदलले आहे. कंगनाने ड्रग्ज, दारू, बीफ सर्व काही घेतल्याची कबुली दिली होती. कंगनाने एकदा सांगितले की, तिने गोमांस कसे खायला सुरुवात केली. ‘ज्या दिवशी मी घर सोडत होते, तेव्हा आईने फक्त एक वचन देण्यास सांगितले होते. ती म्हणाली होती आपण हिंदू आहोत कृपया गोमांस खाऊ नको. तेव्हापासून मला बीफ खाण्याची घाई होती’ असे कंगनाने सांगितले होते.

Kangana Ranaut Latest News
लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून सलमान खानच्या घराची रेकी; पंजाब पोलिसांची माहिती

‘गोमांसात काहीतरी असावे जे आईने खाण्यास मनाई केली आहे. म्हणून मी ते खाल्ले आणि मला ते आवडले. तेव्हापासून मी नियमितपणे गोमांस खातो. मी गोमांस (Beef) खातो पण साप आणि ऑक्टोपस खाण्याचे धाडस करू शकत नाही. परंतु, मी अशी व्यक्ती आहे की तुम्ही माझ्या तोंडात काहीही घालू शकता’ अशीही कंगना म्हणाली होती.

२०१९ मध्ये कंगनाच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट व्हायरल झाले होते. हे ट्विट बहुधा तिची बहीण रंगोलीने केले असावे. ‘गोमांस आणि इतर मांस खाण्यात काहीच गैर नाही. त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही’, असे ट्विटमध्ये लिहिले होते. ८ वर्षांपूर्वी कंगना राणावत शाकाहारी झाली. ती फक्त एकाच धर्मावर विश्वास ठेवत नाही.

Kangana Ranaut Latest News
कामवाली बाई म्हटल्यावर सारा अली खानने दाखवली ग्लॅमरस स्टाईल

दुसरीकडे तिचे भाऊ मांस खातात. असे करून तो कंगनापेक्षा कमी हिंदू होत नाही. कंगनाचे ट्विट आणि मुलाखत व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार विरोध झाला होता. एका व्यक्तीने कंगनाच्या विरोधात पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात केस दाखल केली होती. मात्र, तिला क्लीन चिट मिळाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com