शाहरुखचं कमबॅक;तब्बल चार महिन्यांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट

आर्यन खान प्रकरणानंतर किंग खाननं सर्वच गोष्टींपासून दूर राहणं पसंत केलं होतं.
Shaha Rukh Khan
Shaha Rukh KhanGoogle

2021 चा ऑक्टोबर महिना किंग खान शाहरुखसाठी(ShahRukh Khan) फारच नामुष्कीचा,संकटांचा होता. अहो,ज्याचा २४ वर्षांचा मुलगा ड्रग्ज केसमध्ये पकडला जाईल त्या बापासाठी ते दिवस आणखी कसे असतील. त्यात शाहरुख हा स्वतः शिकला सवरलेला,मध्यमवर्गीय कुटुंबातून कष्टाने वाढलेला. सिनेमात स्ट्रगल करून पुढे आलेला अनं मग सुपरस्टारपदाला पोहोचून मेहनतीच्या पैशाने करोडपती बनलेला. त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यात त्याने सिनेमातल्या जेलशिवाय कधी खऱ्याखुऱ्या जेलची हवा खाल्लेली नाही. त्यामुळे अचानक स्वतःच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात जेलमध्ये गेलेलं पाहून एका बापाची काय परिस्थिती होत असेल तशीच शाहरुखची झाली होती. त्याच्यासोबत त्याचं अख्खं कुटुंब त्यात भरडलं होतं. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खूप नाट्य घडलं. असो,त्याचा पाढा परत न वाचलेला बरा, आपण बोलतोय ते आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुखनं सोशल मीडियापासून दूर राहणं पसंद केलं होतं अनं आता तो तब्बल चार महिन्यांनी सोशल मीडियावर परत आला आहे त्याविषयी.

शाहरुखने त्याच्या एका कमर्शियल जाहिरातीचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केलाय. या जाहिरातीत त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी ही दिसणार आहे. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तो एक लक्झुरीयस गाडी ड्राईव्ह करीत एका आलीशान घराजवळ पोहोचतो. आणि गाडीबाहेर येऊन त्या घराकडे पाहू लागतो. हे सगळं तो फील करतोय घरात एका कम्फर्टेबल कोचवर बसून अन् तितक्यात गोरी तिथं येते. अनं दोघं त्या समोरच्या टेलीव्हिजनवर दिसणाऱ्या विहंगम दृश्याचा आनंद घेत त्या टी.व्हि ची तारीफ करताना दिसतात. शाहरुखनं पोस्ट केलेल्या या व्हिडीओला काही तासातच लाखोंनी व्ह्यूज मिळाले आहेत. तर शाहरुखच्या अनेक दिवसांनी केलेल्या या पोस्टला पाहून लोकांनी मात्र त्याचं कमबॅक दणक्यात साजरं केलंय. कुणी म्हटलंय,'तुला पुन्हा इथे पाहून आनंद झाला'. कुणी म्हटलं,'किंग इज बॅक'. अशा अनेक चांगल्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. शाहरुख त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमात दीपिका पदूकोणसोबत दिसणार आहे. या सिनेमात सलमान खाननं मैत्रीखातर पाहुण्या कलाकारची भूमिका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com