Shah Rukh Khan Vaishno Devi Visit: डंकी हिट होऊ दे! शाहरुख पुन्हा वैष्णो देवीच्या दरबारी... व्हिडिओ व्हायरल

Shah Rukh Khan Vaishno Devi Visit: शाहरुखचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Shah Rukh Khan Vaishno Devi Visit:
Shah Rukh Khan Vaishno Devi Visit:Esakal

Shah Rukh Khan Vaishno Devi Visit: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाचे वर्ष शाहरुखसाठी खुपच खास होते.

या वर्षात शाहरुखने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व गाजवले आणि तो बादशाह कसा हे सिद्ध केले. त्याने जवान आणि पठाण हे दोन सिनेमे बॉलिवूडला दिले ज्यांनी बॉक्स ऑफिसवर हजार कोटींचा टप्पा पार केला.

त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांना शाहरुखच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाकडूनही खुप अपेक्षा आहेत.

वर्षाच्या शेवटी किंग खानचा 'डंकी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता हा सिनेमा हिट होतो की फ्लॉप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर यातच चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवसांपुर्वीच शाहरुख खान पुन्हा एकदा माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहचला आहे. यापुर्वी देखील शाहरुख सिनेमा रिलिज पुर्वी देवीच्या दर्शनासाठी गेला आहे.

Shah Rukh Khan Vaishno Devi Visit:
Sankarshan Karhade: "आज मी पहिल्यांदाच..", टिळकांच्या जन्मस्थानी भेट दिल्यानंतर संकर्षणची खास पोस्ट

आज सकाळी वैष्णोदेवीच्या दरबारात त्याने दर्शन घेतले. शाहरुखचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यावेळी शाहरुख खान डार्क चष्मा आणि त्याच रंगाच्या हुडी जॅकेटमध्ये दिसला. त्याने आपला चेहर लपवला होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला घेरले होते.

पीटीआयने आपल्या अधिकृत X हँडलवर शाहरुखचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेयर करत त्यांनी लिहिले की, "बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आज माता वैष्णो देवी मंदिराला भेट दिली."

शाहरुख खान आता त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजपूर्वी वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जातो अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण पठाण' आणि 'जवान' रिलीज होण्यापूर्वी शाहरुख माँ वैष्णो देवीच्या दरबारात गेला होता. हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले होते. त्यामुळे आता डंकी चित्रपट देखील ब्लॉकबस्टर ठरेल अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केले.

डंकी चित्रपटाबद्दल बोलायचं झाले तर हा सिनेमा 21 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे.

Shah Rukh Khan Vaishno Devi Visit:
Pooja Sawant Love Story: "मला त्याचं स्थळ आलं आणि.." कशी आहे पूजा सावंतची लव्हस्टोरी?

या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशल सह अनेक कलाकारांनी 'डिंकी'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय बोमन इराणी, सतीश शाह, दिया मिर्झा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. डंकी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रभासच्या 'सालार'शी स्पर्धा करणार आहे. त्यामुळे हा सिनेमा किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com