Vijay Varma: अभिनेत्याला आली साडी नेसायची लहर.. म्हणून केला कहर.. थेट आला पदर घेऊन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vijay varma, vijay varma news, vijay varma movies, vijay varma photoshoot, gully boy, darlings

Vijay Varma: अभिनेत्याला आली साडी नेसायची लहर.. म्हणून केला कहर.. थेट आला पदर घेऊन

Vijay Varma News: गली बॉय फेम अभिनेता विजय वर्मा फॅन्सच्या पसंतीचा अभिनेता. विजय वर्मा बॉलिवूड सिनेमांमधून आणि वेबसिरीजमधून उत्तमोत्तम भूमिका साकारत आहे. रणवीर सिंग असो कि आलीया भट.. विजय वर्माची जोडी सर्वांसोबत शोभत आहे.

विजय वर्मा छोटीशी भूमिका जरी साकारत असला तरीही त्याची छाप तो सोडतो. विजय वर्मा आता त्याच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आलाय.

(gully boy darlings fame actor vijay varma special photoshoot in classic metal sari goes viral )

विजय वर्माने चक्क साडीत फोटोशूट केलंय. विजयने काळ्या आणि लाल रंगाची क्लासिक मेटल साडी परिधान केलीय.

विजय वर्माने हे फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करून त्याखाली कॅप्शन लिहिलंय.."तरलतेने आपल्या स्वतःच्या जगाच्या दृष्टीकोनातून, आम्ही कोणत्याही बंधनांचं पालन करत नाही. 'आर्ट इन मोशन' सादर करत आहे,

एक कथा जी ऋतू, लिंग किंवा क्षणभंगुर फॅशन ट्रेंडच्या सीमा ओलांडते. अत्यंत अष्टपैलू विजय वर्मा एक अभिनेता ज्याला कोणत्याही भूमिकेत मर्यादित ठेवता येत नाही." अशी आगळीवेगळी पोस्ट लिहून विजय वर्माने साडी नेसल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

विजयच्या आगळ्यावेगळ्या फॅशनचं त्याच्या फॅन्सनी सुद्धा कौतुक केलंय. विजयने हि फॅशन करत स्त्री - पुरुष समानता दर्शवली आहे. या फोटोवर थेट उर्फी जावेदने कमेंट केली आहे, हि फॅशन पूर्णपणे जादुई असल्याचे म्हटले आहे.

त्याचवेळी विजय वर्माच्या या स्टाइलवर फॅन्सनी सुद्धा भन्नाट कमेंट केल्या आहेत.

एका चाहत्याने लिहिले, 'विजय वर्मा आता पुढील फॅशन आयकॉन आहेत का?' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, 'विजय वर्माने आग लावली आहे.'

तर काही चाहत्यांनी लिहिले की, विजय वर्माने सर्वांचे मन जिंकले आहे आणि तो सर्वात छान अभिनेता आहे.

काही काळापासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची नावे एकत्र जोडली जात आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे डेटिंगच्या अफवांना उधाण आले.

विजय वर्माने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला होता, ज्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

जरी दोघांकडून कोणतीही अधिकृत खुलासा झाला नसला तरीही दोघांचं अफेयर हा सध्या बॉलिवुड मधला चर्चेचा विषय झालाय.

टॅग्स :Marathi News Bollywood